आज आपण त्या युगात आहोत जिथे स्मार्टफोनने बाजारपेठ व्यापली आहे. परंतु  ट्रेडिशनल फीचर्स असलेल्या फोनची मागणी अजूनही कायम आहे. याचे कारण असे की अनेकांना अजूनही स्मार्टफोन खरेदी करणे परवडत नाही आणि असे फोन स्वस्त असल्यामुळे त्यांच्या खिशाला परवडतात. याशिवाय, बरेच लोक  सेकंडरी फोन म्हणून  सेल्युलर फोन वापरतात. Nokia, Moto आणि Lava, itel सारख्या कंपन्या आजही बाजारात फीचर फोन बनवत आहेत. आज आम्ही तुम्हाला २ हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत येणार्‍या फीचर फोनबद्दल सांगत आहोत, जे तुम्हाला आवडू शकतात.

Amazon Great Summer Sale Start On May Second hundreds of deals across various product categories
अर्ध्या किंमतीत स्मार्टफोन, स्मार्टवॉच, आयपॅड, खरेदी करण्याची संधी; कधी सुरु होणार सेल ? जाणून घ्या
Apple plans to make iPads attractive again give the iPad Pro and iPad Air tablet a makeover On Seven May
Apple आयपॅड पुन्हा होणार स्टेटस सिम्बॉल; मोठा डिस्प्ले, दमदार प्रोसेसर, कंपनी ‘या’ दिवशी करणार घोषणा
Google New Feature Speaking Practice part of Google Search Labs To Improve English speaking skills For All Users
आता गूगल शिकवणार तुम्हाला इंग्रजी; AIची घेणार मदत, असा होणार ‘या’ फीचरचा वापर
Boult launches smart home audio devices first soundbars Bassbox X Series in India only 4999 rupees new sound system
फक्त पाच हजारांत घरी आणा Boult चा साउंडबार; टीव्ही, कॉम्प्युटर, मोबाइललाही करता येईल कनेक्ट

Nokia 105 Single SIM: १,२९९ रुपये

नोकिया 105 सिंगल सिम फोनची किंमत१,२९९ रुपये आहे. फोनच्या खरेदीवर १,२०० रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर आहे. या फोनमध्ये २००० संपर्क आणि ५०० एसएमएस सेव्ह केले जाऊ शकतात. या फोनमध्ये सीरीज 30+ प्रोसेसर देण्यात आला आहे. डिव्हाईसमध्ये ३.५ मिमी ऑडिओ जॅक आहे.

Lava A5: १,३८४ रुपये

लावाच्या या फोनवर १,३०० रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर आहे. या फीचर फोनमध्ये ०.३ मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आहे. या फोनमध्ये २४० x ३२० पिक्सेल रिझोल्यूशनसह २.४ इंच डिस्प्ले आहे. या फोनमध्ये २४ MB स्टोरेज आहे. तथापि, स्टोरेज मायक्रोएसडी कार्डद्वारे 32 जीबी पर्यंत वाढवता येते. लावाच्या या फोनमध्ये १००० mAh बॅटरी देण्यात आली आहे.

आणखी वाचा : नवीन फोनचा प्लान असेल तर थोडं थांबा ! OnePlus Nord 2T 5G लवकरच भारतात येतोय, ५० MP रियर कॅमेरा आणि बरंच काही…

Motorola a10: १,२९९ रुपये

Motorola A10 ची किंमत १,२९९ रुपये आहे. या फोनवर १,२०० रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर देखील आहे. Moto च्या या फीचर फोनचे स्टोरेज ३२ GB पर्यंत वाढवता येऊ शकते. हा फोन ड्युअल सिमला सपोर्ट करतो. याला पॉवर देण्यासाठी १७५० mAh बॅटरी देण्यात आली आहे. Motorola फोनवर २ वर्षांची रिप्लेसमेंट वॉरंटी आहे. हा Moto फोन ६ भारतीय भाषांसाठी इनपुट ऑप्शनसह येतो. यात वायरलेस एफएमची सुविधा आहे.

Itel Ace: ८४९ रुपये

Amazon वरून itel Ace फोन खरेदी केल्यास ८०० रूपयां पर्यंत एक्सचेंज ऑफर मिळेल. या आयटेल फोनची स्क्रीन १.८ इंच आहे. या फोनमध्ये १००० mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. फोनमध्ये व्हायब्रेशन मोड देखील उपलब्ध आहे. याशिवाय या फीचर फोनमध्ये ८ भारतीय भाषांचा सपोर्ट आहे. हँडसेटचे वजन ६९ ग्रॅम आहे. फोनमध्ये ३.५ mm ऑडिओ जॅक देण्यात आला आहे.

आणखी वाचा : मोठ्या बॅटरीसह भेटीला येतोय Tecno Pova 3 ‘पॉवरहाऊस स्मार्टफोन’, जाणून घ्या फीचर्स

Lava FLIP: १,६९९ रुपये

या लावा फोनवर १,६०० रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर आहे. हा फोन निळ्या आणि लाल रंगात येतो. मायक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज ३२ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. त्याची बॅटरी तीन दिवस चालेल असे कंपनीचे म्हणणे आहे. या फीचर फोनमध्ये ड्युअल सिम स्लॉट देण्यात आला आहे. फोनमध्ये बेसिक कॅमेरा देखील उपलब्ध आहे. फोनमध्ये १२०० mAh बॅटरी आहे. फोनचे वजन ९६ ग्रॅम आहे.