OnePlus ने गेल्या महिन्यात आपला नवीन स्मार्टफोन OnePlus Nord 2T 5G लॉन्च केला होता. हा फोन निवडक युरोपियन बाजारपेठांमध्ये उपलब्ध करून देण्यात आला होता. आता अशी बातमी आहे की, OnePlus Nord 2T 5G लवकरच भारतात लॉन्च केला जाऊ शकतो. मात्र अद्याप लॉन्चची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. आम्ही तुम्हाला OnePlus Nord 2T 5G शी संबंधित सर्व महत्त्वाची माहिती सांगणार आहोत. टिप्स्टर पारस गुगलानी (@passionategeekz) यांनी उद्योगातील सूत्रांच्या आधारे माहिती देताना सांगितले की, हा स्मार्टफोन भारतात जूनमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. अहवालात कोणत्याही तारखेचा उल्लेख करण्यात आलेला नसला तरी लवकरच हा फोन भारतात उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे. आणखी वाचा : OnePlus 10R, OnePlus 10 Pro, OnePlus Nord 2 वर बंपर सूट, १० हजारांपर्यंत बचत करण्याची संधी Oneplus Nord 2T 5G SpecificationsOnePlus Nord 2T 5G स्मार्टफोनबद्दल सर्व फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स आधीच उघड झाली आहेत. या डिव्हाइसमध्ये 6.43 इंच फ्लॅट AMOLED डिस्प्ले पॅनल आहे. फोनमध्ये फुलएचडी + रिझोल्यूशन स्क्रीन आहे. स्क्रीनचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. डिस्प्ले पॅनलमध्ये पंच-होल कटआउट आहे. फोनच्या पॉवर बटनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर देखील उपलब्ध आहे. OnePlus Nord 2T 5G ग्राफिक्ससाठी MediaTek Dimensity १३०० प्रोसेसर आणि Mali-G77 MC9 GPU द्वारे समर्थित आहे. या फोनमध्ये ८ GB पर्यंत रॅम आणि २५६ GB पर्यंत इनबिल्ट स्टोरेज आहे. स्मार्टफोनला पॉवर देण्यासाठी ४५०० mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी ८० W SuperVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. सॉफ्टवेअरबद्दल बोलायचे झाले तर हा डिव्हाईस Android 12 आधारित OxygenOS 12.1 सह मिळतोय. आणखी वाचा : Realme ने लॉन्च केला केला बजेट फ्री स्मार्टफोन, २५६ GB स्टोरेजसह जाणून घ्या किंमत आणि बरंच काही…. स्मार्टफोनमध्ये ५० मेगापिक्सेल Sony IMX766 प्राथमिक सेन्सर आहे जो OIS ला सपोर्ट करतो. OnePlus Nord 2T 5G मध्ये ८ मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड कॅमेरा आणि २ मेगापिक्सेलचा मॅक्रो सेन्सर आहे. समोर फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी ३२ मेगापिक्सलचा IMX615 सेन्सर आहे. OnePlus Nord 2T 5G Priceकिंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, OnePlus Nord 2T 5G डिव्हाईस युरोपमध्ये ३९९ युरो (सुमारे ३३,३०० रुपये) लॉन्च करण्यात आले होते. पण भारतात हा हँडसेट ३० हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत लॉन्च केला जाऊ शकतो.