Top 5 premium smartphones : प्रिमियम स्मार्टफोनमध्ये कॅमेरा आणि प्रोसेसर उच्च गुणवत्तेचा मिळतो. फीचर्सही जबरदस्त मिळतात. मात्र बाजारात अनेक फोन्स उपलब्ध आहेत. यामुळे कोणता फोन घ्यावा आणि कोणता नाही? असा प्रश्न पडतो. तुम्हीही प्रिमियम स्मार्टफोन निवडताना गोंधळून जात असाल तर आज आम्ही तुम्हाला काही सर्वोत्तम प्रिमियम फोन्सबाबत माहिती देत आहोत. तुम्ही यातून तुमच्या आवडीचा प्रिमियम स्मार्टफोन खरेदी करू शकता. कोणते आहेत हे फोन्स? जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१) अ‍ॅपल आयफोन १४ प्रो मॅक्स

Apple iPhone 14 Pro Max या वर्षीच लाँच झाला आहे. आपले विशिष्ट फीचर जसे, क्रॅश डिटेक्शन सिस्टिम, एसओएस कनेक्टिव्हिटी आणि इतर फीचरमुळे तो आधीच चर्चेत आला आहे. या स्मार्टफोनमध्ये न्युरल इंजिनसह ए १६ बायोनिक चिपसेट, ४ एक्स उच्च रेझोल्युशनसह ४८ एमपी प्रायमरी कॅमेरा मिळतो. अ‍ॅपलने अ‍ॅक्शन मोडसह ३० एफपीएस पर्यंत ४ के डोल्बी व्हिजनमध्ये सिनेमॅटिक मोड दिला आहे. स्मुथ, स्थीर व्हिडिओ मिळवण्यासाठी हे वैशिष्ट्य देण्यात आले आहे.

(Meta ते Twitter, २०२२ मध्ये चुकीच्या निर्णयांचा मोठ्या Tech कंपन्यांना कसा बसला फटका? जाणून घ्या)

२) सॅमसंग गॅलक्सी झेड फोल्ड ५ ५जी

Samsung Galaxy Z Fold 4 5G स्मार्टफोनला अनोखे डिजाईन मिळाले असून तो फोल्ड होतो. त्यामुळे त्याचा तुम्ही टॅबसारखा वापर करू शकता. हा फोन ग्रेग्रीन, बीज आणि फँटम ब्लॅक या तीन रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. स्मार्टफोनमध्ये, ६.२ इंच कव्हर डिस्प्ले, ७.६ इंच मेन डिस्प्ले देण्यात आला आहे. हा आतापर्यंतचा सर्वात मजबूत गॅलक्सी फोल्डेबल फोन असल्याचा दावा केला जातो. स्मार्टफोनचे पुढील आणि मागील पॅनल एक्सक्लुझिव्ह गोरिला ग्लास विक्टस प्लसने बनवलेला आहे. हा स्मार्टफोन वॉटर रेझिस्टेंट आहे.

३) वन प्लस १० प्रो ५जी

OnePlus 10 Pro 5G स्मार्टफोनमध्ये ४८ एमपी प्रायमरी कॅमेरा, ५० एमपी अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा आणि ८ एमपी टेलिफोटो लेन्स मिळतो. सेल्फीसठी फोनमध्ये ३२ एमपी कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये ६.७ इंच स्क्रीन आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८ जेन १ प्रोसेसर देण्यात आले आहे.

(फोल्डेबल तंत्रज्ञानात स्पर्धा वाढणार, Foldable smartphone नंतर सॅमसंगचे ‘या’ उत्पादनावर काम सुरू)

४) शाओमी १२ प्रो ५ जी

Xiaomi 12 Pro 5G स्मार्टफोनमध्ये ५० एमपी सोनी आयएमएक्स ७०७ सेन्सर देण्यात आला असून त्यासह ५० एमपी टेलिफोटो आणि ५० एमपी अल्ट्रा वाइड सेन्सर देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये ६.७३ इंच अमोलेड डिस्प्ले देण्यात आला असून १२० वॅट हायपरचार्जरसह ४ हजार ६०० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

५) आयक्यूओओ निओ ६ ५जी

iQoo Neo 6 5G स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८७० ५ जी प्रोसेसर मिळते. फोनध्ये ६४ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला असून ८ एमपी वाइड अँगल कॅमेरा आणि २ एमपी मॅक्रो कॅमेरा मिळतो. फोनमध्ये ८० वॅट फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानासह ४७०० एमएएच बॅटरी मिळते.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Top 5 premium smartphones in india check price and features ssb
First published on: 19-12-2022 at 15:50 IST