Twitter ही एक मायक्रोब्लॉगिंग साईट आहे. एलॉन मस्क हे ट्विटर सीईओ आहे. भारतातील ट्विटर वापरकर्त्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. ट्विटरने तब्बल २५ लाख ट्विटर अकाउंट्स बॅन केली आहेत. ही अकाउंट्स कंपनीने मार्च ते एप्रिल महिन्यादरम्यान बॅन केली आहेत. कंपनीने याबद्दलची माहिती आपल्या मासिक रिपोर्टमध्ये दिली आहे.

ट्वीटरने सांगितले २५ मार्च ते २६ अप्रैल दरम्यान, बाल लैंगिक शोषण आणि भावना उद्दीपित करणाऱ्या कंटेंटचा (porn) प्रसार करणाऱ्या तसेच दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या सुमारे २५,५१,६२३ अकाउंट्सवर बंदी घातली आहे. याबाबतचे वृत्त हिंदुस्तान टाइम्सने दिले आहे.

हेही वाचा : भारतात अ‍ॅपल स्टोअर्सची मोठी कमाई: ४० लाख रुपये भाडे देऊन कंपनीने कमावले तब्बल ‘इतके’ कोटी

ट्विटरच्या मासिक रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. जो भारताच्या नवीन आयटी नियम २०२१ चा एक भाग आहे. नियमानुसार ५० लाखांपेक्षा जास्त वापरकर्ते असलेल्या प्रमुख डिजिटल आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने मासिक रिपोर्ट सादर करणे आवश्यक आहे. २६ मार्च ते २५ एप्रिल या कालावधीमध्ये ट्विटरला भारतातून केवळ १५८ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये बहुतांश तक्रारी या गैरवर्तन किंवा छळ(८३), संवेदनशील अ‍ॅडल्ट कंटेंट(४१), द्वेषपूर्ण कंटेंट(१९) आणि बदनामी (१२) याच्याशी संबंधित होत्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

WhatsAppने एप्रिलमध्ये ७४ लाख भारतीय अकाउंट्स केले बॅन

WhatsApp: IT नियम 2021 अंतर्गत, WhatsApp दर महिन्याला मासिक सुरक्षा अहवाल( Monthly Sefty Report) जारी करते. कंपनीने एप्रिल महिन्याचा अहवालही प्रसिद्ध केला होता. १ एप्रिल ते ३० एप्रिल दरम्यान व्हॉट्सअ‍ॅपने ७४ लाख भारतीय अकाउंट्सवर बॅन केले आहेत. हे सर्व अकाउंट्स नवीन आयटी नियमाचे पालन करत नव्हते म्हणजेच हे अकाउंटस् कोणत्या कोणत्या स्वरुपात प्लॅटफॉर्मवर चुकीच्या गोष्टींमध्ये सहभागी होते. बँन केलेल्या अकाउंट्सपैकी कंपनीने स्वत:हून २४ लाख अकाउंट्स कोणत्याही तक्रारीशिवाय बॅन केले आहेत.