टर्कीमध्ये एकापाठोपाठ एक झालेल्या पाच भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात वित्त व जीवितहानी झाली असून शेकडो इमारती जमीनदोस्त झाल्या. या घटनेत आत्तापर्यंत १५ हजार नागरिकांचा मृत्यू झाला असून २० हजारांपेक्षा जास्त नागरीक जखमी झाले आहेत. आतापर्यंत २५ हजारांपेक्षा जास्त जणांचा ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले आहे. टर्कीमध्ये झालेल्या भूकंपानंतर तेथील नागरिकांचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सरकारविरोधात संताप वाढला आहे. त्यामुळे टर्की सरकारने देशात ट्विटरवर बंदी घातली आहे.

टब्लॉक्स इंटरनेट ऑब्झर्व्हेटरी ही कंपनी जगभरातील कनेक्टिव्हिटीचा आढावा घेत असते. याच कंपनीने टर्की सरकारने ट्विटरच्या सेवांवर बंदी घालण्यात आल्याची माहिती दिली होती. भूकंप झाल्यानंतर दोन दिवसांनी ट्विटरवर बंदी घालण्यात आल्याचे या कंपनीने सांगितले.

हेही वाचा : Video: Google ला मोठा झटका; नवीन एआय ‘Bard’ने केलेल्या ‘या’ चुकीमुळे गमावले १०० अब्ज डॉलर्स

मायक्रोब्लॉगिंग साईट असणाऱ्या ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क यांनी गुरुवारी केलेल्या ट्विटमध्ये लवकरच टर्कीमध्ये ट्विटरची सेवा सुरु करणार असल्याचे सांगितले. टर्की सरकारने ट्विटरला सांगितले आहे की, लवकरच ट्विटर देशात पुन्हा सुरु केले जाईल असे एलॉन मस्क म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सरकारविरोधात लोकांचा संताप

एकामागोमाग एक असे भूकंपाचे धक्के सहन करणाऱ्या टर्की देशात लोकांचा सरकारविवधतील संताप वाढत आहे. लोकांना मदत करण्यासाठी तेथील सरकार आवश्यक पाऊले उचलत नसल्याचे लोकांचे म्हणणे आहे. त्यामुळे लोकांचा सरकारविरोधात रोष वाढत आहे. लोकांचा रोष बघता टर्की सरकारने ट्विटर आणि इंटरनेटवर बंदी घातली आहे.