ट्विटरचे सीईओ आणि अब्जाधीश एलॉन मस्क यांनी काही काळापूर्वी एक्स (ट्विटरवर आधी) वर एक पोस्ट शेअर करताना, अॅपल आयफोनचे भरभरुन कौतुक केले आहे. या पोस्टनंतर तुम्हालाही वाटेल की, मस्क फक्त आयफोनचा चाहता आहे, पण तसे नाही. अलीकडेच मस्कने आणखी एक पोस्ट केली आहे ज्यामध्ये एलॉन मस्क आता दुसऱ्याच स्मार्टफोनची प्रशंसा करताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एलॉन मस्कचं आता ‘या’ स्मार्टफोनवर जडलं प्रेम

एलॉन मस्कनी काही दिवसापूर्वी अॅपल आयफोनची प्रशंशा केली होती. त्यांनी ‘एक्स’वर पोस्ट करुन iPhone 15 खरेदी करणार असल्याची माहिती दिली आणि त्यांनी iPhone 15 खरेदी करण्यामागचे कारणही सांगितंलं होतं. आता एलॉन मस्क पिक्सेल फोनची प्रशंसा करताना दिसत आहे. Google ची नवीन Pixel 8 मालिका ४ ऑक्टोबर रोजी लाँच झाली आहे. ही मालिका लाँच झाल्यानंतर मस्कने आता पिक्सेल फोन एक परफेक्ट फोन असल्याचे पोस्ट केले आहे.

(हे ही वाचा : ४,७०० रुपयांमध्ये खरेदी करा Google Pixel 7a; ‘या’ प्लॅटफॉर्मवर मिळतेय आकर्षक ऑफर, एकदा पाहाच )

Apple चे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कूक यांनी एक्सवर काही फोटो शेअर केलेत. टीम कूक यांची पोस्ट रिपोस्ट करुन मस्क यांनी फोटो, व्हिडिओची क्वालीटी चांगली आहे, असे म्हणाले आणि iPhone 15 च्या खास वैशिष्ट्यांचे कौतुक केले होते. आता त्यांनी गुगलच्या पिक्सेल सीरीजमधील नवीन स्मार्टफोन चांगले आहेत, असं नमूद केलं आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Twitter owner elon musk has praised it by tweeting and described it as pixel perfect pdb
First published on: 07-10-2023 at 19:35 IST