Twitter blue service : ट्विटरने ब्ल्यू टीकसाठी पैसे घेणे सुरू केले आहे. पूर्वी ही सेवा मोफत होती. मात्र, एलन मस्क यांनी ट्विटरची धुरा सांभाळल्यानंतर ट्विटरमध्ये अनेक बदल होत आहेत. ब्ल्यू टीकसाठी पैसे घेणे हे त्याच बदलाचा भाग आहे. ट्विटरने ब्ल्यू टीकसाठी ८ डॉलर प्रति महिना सब्सस्क्रिप्शन सेवा सुरू केली आहे. अलिकडेच हा निर्णय घेण्यात आल्यानंतर सध्या ५ देशांमध्ये ही सेवा उपलब्ध आहे. या ५ देशांमधील वापरकर्त्यांना ब्ल्यू टीकसाठी आता ८ डॉलर प्रति महिना शुल्क द्यावा लागेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या देशांमध्ये सुरू झाली ‘ट्विटर ब्ल्यू’ सेवा

ट्विटरने ब्ल्यू टीकसाठी पैसे घेण्याची सेवा आयओएससाठी सुरू केली आहे. सत्यापनासह ट्विटर ब्ल्यू सेवा सध्या, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि युनायटेड किंगडमध्ये आयओएसवर उपलब्ध आहे. २००९ मध्ये ट्विटर ब्ल्यू टीकची सुरुवात झाली होती. मोठ्या सेलिब्रिटींच्या खात्यांची पडताळणी करण्यासाठी ही सेवा सुरू करण्यात आली होती.

भारतात कधी सुरू होणार?

प्रभू नावाच्या युजरने ट्विटरवर मस्क यांना भारतात ट्विटर ब्ल्यू सेवा कधी सुरू होणार, असा प्रश्न केला होता, त्यावर एका महिन्यापेक्षाही कमी कालावधीत, असे उत्तर मस्क यांनी दिले. म्हणजे याच महिन्यात ही पेड सेवा भारतात सुरू होण्याची शक्यता आहे.

(Samsung vs apple : पण त्यांच्याकडे असा फोन नाही.. सॅमसंगने जाहिरातीतून केले अ‍ॅपलला ट्रोल, पाहा हा व्हिडिओ)

ट्विटरसाठी ४४ कोटींचा करार

टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क यांनी तब्बल ४४ अब्ज डॉलर्सला ट्विटरची खरेदी केली. त्यानंतर मस्क यांनी अनेक निर्णय घेतले. त्यांनी ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह काही उच्च अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली. त्यानंतर मस्क काय करतीय या विषयी अनेकांच्या मनात भिती होती. नोकर कपातीबाबत अफवा होत्या. मात्र त्या खऱ्या ठरल्या. मस्क यांनी जवळपास ५० टक्के ट्विटर कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले.

म्हणून नोकरकपात केली

एलॉन मस्क यांनी या निर्णयासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. आपल्या ट्विटर अकाउंटवर त्यांनी भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे पाचच्या सुमारास ट्वीट करून याबाबत माहिती दिली. ट्विटरमधील कर्मचारी कपातीविषयी बोलायचे झाले, तर दुर्दैवाने आमच्यासमोर काही पर्यायच उरला नव्हता. कंपनीचे दिवसाला तब्बल ४ दशलक्ष डॉलर्सचे नुकसान होत होते, अशी माहिती मस्क यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Twitter started twitter blue service in 5 countries ssb
First published on: 06-11-2022 at 09:58 IST