Twitter suspend indian rival koo acount : ट्विटरची धुरा सांभाळल्यानंतर इलॉन मस्क हे एकापाठोपाठ एक मोठे निर्णय घेत आहेत. त्यांच्या निर्णयांमुळे कंपनीमध्ये आणि युजर्समध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. ब्ल्यू टीक सेवा शुल्कासह सुरू केल्यानंतर बनावट खात्यांची तक्रार वाढली. यानंतर ही सेवा बंद करून काही दिवसांनी परत तीन नवीन रंगांसह टीक उपलब्ध करण्यात आले. ट्विटरने काही पत्राकारांचे ट्विटर खातेदेखील निलंबित केल्याचे काही अहवालांतून समोर आले. याचा काहींकडून विरोध होत असून आता ट्विटरला आपल्या प्रतिस्पर्ध्यांचा हेवा वाटतोय की काय? असे त्याच्या एका कृतीतून दिसून आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ट्विटरने आपला भारतीय प्रतिस्पर्धी कू याचे खाते निलंबित केले आहे. केवळ ‘Koo’च नव्हे तर ट्विटरने मास्टोडोनचे खाते देखील निलंबित केले आहे. मस्क यांनी ट्विटर घेतल्यानंतर गोंधळामुळे अनेक युजर्स मास्टोडोनकडे वळल्याचे काही अहवालांतून समोर आले होते. या कारवाईमुळे ट्विटरला आपले प्रतिस्पर्धी खुपत आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

(फोन पाण्याने भिजल्यास ‘हे’ करू नका, अन्यथा होईल मोठे नुकसान)

‘कू’च्या सहसंस्थापकाने दिली माहिती

‘Koo’चे सहसंस्थापक अप्रमेय राधाकृष्ण यांनी या कारवाईबाबत ट्विटरवरून माहिती दिली. ‘कू’च्या ट्विटर हँडलपैकी एकावर नुकतीच बंदी घालण्यात आली आहे. कशासाठी? कारण आम्ही ट्विटरशी स्पर्धा करतो? आज मास्टोडोनलाही ब्लॉक करण्यात आले. हे कसले भाषण स्वातंत्र्य आहे आणि आपण कोणत्या जगात राहत आहोत? असा प्रश्न ट्विटरच्या कारवाईनंतर अप्रमेय राधाकृष्ण यांनी उपस्थित केला.

अप्रमेय राधाकृष्ण यांनी ब्लॉक झालेल्या खात्याचे स्क्रीनशॉट देखील शेअर केले, ज्यात ट्विटरच्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केल्यामुळे खाते ब्लॉक करण्यात आलयाचा उल्लेख आहे. मस्क यांचाबाबत माहिती देणाऱ्या पत्रकारांचे खाते निलंबित केल्याच्या पार्श्वभूमीवर हे करण्यात आले आहे. निलंबित झालेल्यांपैकी बहुतेक वॉशिग्टन पोस्ट, न्यूयॉर्क टाइम्स, मॅशेबल आणि सीएनएनसह जगातील शीर्ष मीडिया कंपन्यांशी संबंधित आहेत.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Twitter suspend indian rival koo acount from its platform ssb
First published on: 18-12-2022 at 10:03 IST