आजकाल भारतीय बाजारात अनेक नवीन फीचर्ससह नवीन स्मार्टफोन लॉंच होत आहेत. MIDIGI ने BISON GT2 5G आणि BISON GT2 Pro 5G हे दोन नवीन स्मार्टफोन बाजारात लॉंच केले आहेत. या फोनमध्ये तुम्हाला ६१५० mAh बॅटरी आणि ६४ MP कॅमेरा दिला जात आहे. कंपनीने मागील वर्षी याच सीरिजमध्ये UMIDIGI BISON GT लाँच केला होता. त्यानंतर आता BISON GT2 5G आणि BISON GT2 Pro 5G लाँच करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या फोनच्या विक्रीबद्दल माहिती देताना कंपनीने सांगितले की, त्यांची विक्री फेब्रुवारीच्या अखेरीस सुरू होईल. कंपनीने माहिती दिली आहे की फोनची पहिली जागतिक विक्री २१ फेब्रुवारी २०२२ पासून सुरू होणार आहे. दुसरीकडे, जर आपण या दोन फोनच्या फिचर्सबद्दल बोलायचं झालं तर ते जवळजवळ सारखेच आहेत. पण, काही फिचर्स आणि स्टोरेज कॅपेसिटी वेगवेगळी आहे. चला जाणून घेऊया या फोन्सची संपूर्ण माहिती.

या फोनची किंमत किती आहे?
UMIDIGI ने या दोन्ही स्मार्टफोन्सचे 4G व्हेरिएंट देखील सादर केले आहेत. तर BISON GT2 5G च्या 8GB + 128GB व्हेरिएंटची किंमत $२९९.९९ (अंदाजे रु. २२,५००) आहे आणि BISON GT2 Pro 5G च्या 8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत $३३९.९९ (अंदाजे २५,००० हजार रूपये) असून याची विक्री येत्या फेब्रूवारी महिन्यापासून सुरू होणार आहे.

आणखी वाचा : Adhaar Card : तुमचं आधार कार्ड बनावट तर नाही ना, अशा प्रकारे ओळखा….

कंपनीने या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये जवळपास सारखेच फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स दिले आहेत. यात ६.५ इंचाचा डिस्प्ले आहे, जो फुलएचडी+ डिस्प्ले आहे. रिफ्रेश दर ९० Hz आहे आणि गुणोत्तर २०:९ आहे. दोन्ही फोनमध्ये समान कॅमेरा देण्यात आला आहे, ज्याचा मेन कॅमेरा ६४ MP आणि ८ MP वाइड अँगल कॅमेरा आहे. याशिवाय ५ MP मॅक्रो शूटर देखील देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी २४ MP फ्रंट कॅमेरा आहे.

दुसरीकडे या फोन्सच्या प्रोसेसरबद्दल बोलायचं झालं तर या दोन्ही फोनमध्ये MediaTek Dimensity 900 5G प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनमध्ये 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज आहे. BISON GT2 5G मध्ये १२८ GB अंतर्गत स्टोरेज आणि BISON GT2 Pro 5G मध्ये २५६ GB इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. हे दोन्ही ५१२ GB पर्यंत वाढवता येऊ शकतात.

आणखी वाचा : Budget 2022 : केंद्रीय अर्थसंकल्पाचे प्रत्येक अपडेट या अ‍ॅपवर उपलब्ध असेल, जाणून घ्या कसं वापरायचं?

विशेष काय आहे?
या फोनमध्ये पॉवरफुल बॅटरी दिली जात आहे, जी ६१५० mAh ची मोठी बॅटरी आहे. या फोन्समध्ये १८ W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे. तसंच IP69 आणि IP69K वॉटरप्रूफ आणि डस्टप्रूफ रेटिंग देखील समाविष्ट आहेत. कनेक्टिव्हिटीसाठी, त्यांच्याकडे NFC, WiFi 6, Bluetooth 5.2, L1 + L5 ड्युअल बँड आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Umidigi bison gt2 smartphone launched with 6150mah battery and 64mp camera prp
First published on: 31-01-2022 at 20:01 IST