UPI Transactions : नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) व्यवहार जलद आणि अधिक कार्यक्षम करण्याचा निर्णय घेतला आहे. १६ जून २०२५ पासून, UPI व्यवहार फक्त १५ सेकंदात पूर्ण होतील. सध्या UPI व्यवहार पूर्ण होण्यासाठी ३० सेकंदाचा वेळ लागत होता. या बदलाचा उद्देश UPI वापरकर्त्याचा अधिक चांगली सुविधा देणे आणि व्यवहार पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ कमी करणे हा आहे. NPCIने बँका आणि पेमेंट अॅप्सना विविध UPI सेवांसाठी जलद प्रक्रिया मानके लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे वापरकर्त्यांना जलद व्यवहार करण्याची खात्री आणि अधिक विश्वासार्ह सविधा मिळेल अशी अपेक्षा आहे.

UPI API व्यवहारासाठी सध्या प्रतिसाद वेळ आणि सुधारित प्रतिसाद वेळ

रिक्वेस्ट पे / रिस्पॉन्स पे (Request Pay / Response Pay ) ३० सेकंद १५ सेकंद
व्यवहार स्थिती तपासा (Check Transaction Status) ३० सेकंद १० सेकंद
पूर्ण केलेला व्यवहार कॅन्सल करणे (Transaction Reversal) ३० सेकंद १० सेकंद
पत्ता तपासणे १५ सेकंद १० सेकंद

या निर्णयाचा उद्देश पेमेंट प्रक्रिया, व्यवहार पडताळणी आणि पूर्ण झालेला व्यवहार कॅन्सल करण्यामध्ये होणारा विलंब कमी करणे आहे. NPCI ने सर्व सहभागी संस्थांना सल्ला दिला आहे की,”या जलद वेळेमुळे तांत्रिक घट किंवा सेवा व्यत्यय वाढणार नाहीत याची खात्री करावी.”

१२ एप्रिल रोजी झालेल्या UPI आउटेजनंतर हे बदल करण्यात आले आहेत, जिथे NPCI ने तांत्रिक समस्यांमुळे आंशिक व्यवहार अपयशी ठरल्याचे मान्य केले आणि जलद निराकरण करण्याचे आश्वासन दिले.

एप्रिलमध्ये देशातील दैनिक युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) व्यवहार ६०० दशलक्षच्यावर पोहोचले. १ मे रोजी सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, “या महिन्यात इन्स्टंट पेमेंट सिस्टममध्ये ५९६ दशलक्ष व्यवहार नोंदवले गेले, जे मार्चमध्ये ५९० दशलक्ष होते.”

अलीकडेच, मार्च आणि एप्रिलमध्ये UPI ला अनेक समस्यांचा सामना करावा लागला ज्यामुळे GPay आणि PhonePe सारख्या अॅप्समध्ये गंभीर व्यत्यय आले, ज्यामुळे प्लॅटफॉर्मच्या विश्वासार्हतेबद्दल वाढत्या चिंतेकडे लक्ष वेधले गेले.

२६ मार्च, १ एप्रिल आणि १२ एप्रिल या तीन आठवड्यात तीन मोठ्या समस्यांची नोंद झाली आहे ज्यामुळे मासिक डिजिटल व्यवहारांमध्ये सुमारे २५ लाख कोटी रुपयांची प्रक्रिया करणाऱ्या सिस्टम हॅल करण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहेत.

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) ने केलेल्या तपासणीत असे दिसून आले आहे की, ही समस्या तांत्रिक देखरेखीमुळे उद्भवली. सिस्टमच्या आर्किटेक्चरमध्ये ट्रान्झॅक्शन स्टेटस चेक लिमिटरचा अभाव.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘चेक ट्रान्झॅक्शन एपीआय’ च्या फ्लडिंगमुळे ही समस्या उद्भवली असल्याचे आढळून आले. शिवाय, असे आढळून आले की काही पीएसपी बँका जुन्या व्यवहारांसाठी ‘चेक ट्रान्झॅक्शन’ साठी अनेक वेळा विनंत्या पाठवत होत्या, असे एनपीसीआयने म्हटले आहे.