व्हॉट्सअ‍ॅप हे सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप आहे. आपण कितीही व्यस्त असलो तरी व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून आपल्या प्रियजनांच्या संपर्कात राहतो. पण कधीकधी आपल्या फोनमध्ये कॉन्टॅक्टसचा भडीमार होतो आणि त्यातून इच्छुक व्यक्तीशी चॅट करण्यासाठी आधी अ‍ॅप त्या सगळ्या कॉन्टॅक्टस मधुन त्या व्यक्तीचा क्रमांक शोधून त्या व्यक्तीशी चॅट करता येते. इतर कामात व्यस्त असताना पटकन एखाद्याला मेसेज करणे कठीण जाते. अशावेळी एक ट्रिक वापरून तुम्ही अ‍ॅप न उघडताच सहजरित्या कोणालाही मेसेज करू शकता. हे फिचर बऱ्याच जणांना माहित नसते. काय आहे हे व्हॉट्सअ‍ॅपचे फिचर जाणून घेऊया.

व्हॉट्सअ‍ॅपद्वारे चॅट शॉर्टकट हे फिचर देण्यात आले आहे. ज्यामध्ये अ‍ॅप न उघडताच शॉर्टकट वापरून कोणालाही मेसेज करणे शक्य आहे. फोनमधील असंख्य मेसेजेसमधुन एखाद्या व्यक्तीचा क्रमांक शोधण्याचा वेळ यामुळे वाचतो.

Smartphone Hack : तुमचा मोबाईल हॅक तर झाला नाही ना? या ट्रिक्स वापरून लगेच ओळखा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

असे वापरा शॉर्टकट फिचर

  • हे फिचर वापरण्यासाठी तुम्हाला कोणत्या क्रमांकाचा शॉर्टकट तयार करायचा आहे, त्याचे चॅट उघडा.
  • त्यानंतर सर्वात वर उजव्या बाजुला तीन डॉट्स दिले आहेत त्यावर क्लिक करा.
  • त्यातील मोर (more) पर्याय निवडा.
  • तिथे तुम्हाला अ‍ॅड शॉर्टकट (Add Shortcut) हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. तुम्ही निवडलेल्या क्रमांकाचा शॉर्टकट तयार झाला आहे.
  • अशाप्रकारे इतर क्रमांकाचा शॉर्टकट देखील तुम्ही होम स्क्रीनवर ॲड करू शकता.
  • यामुळे ॲप न उघडता तुम्ही सहजरित्या शॉर्टकट पर्याय वापरून चॅट ओपन करू शकता. यासाठी फक्त या शॉर्टकट पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • तसेच फक्त मेसेजचा रिप्लाय द्यायचा असेल तर नोटिफिकेशन पॅनलमधुन हा पर्याय उपलब्ध असतो. हे फिचर अँड्रॉइड फोनमध्ये वापरता येते.