ChatGpt : सध्याच्या काळात ChatGpt हे सध्या खूप चर्चेत असलेला विषय आहे. हे माध्यम असे आहे की तुम्ही जे त्याला विचाराल त्याचे त्याच्याकडे असलेल्या माहितीरून तो आपल्याला उत्तर देईल. सध्या ते इंग्रजी भाषेवर काम करते. हे भविष्यात इतर भाषांमध्ये जोडले जाऊ शकते. यामुळे तुम्हाला कमीत कमी वेळा तुम्हाला हवी असलेली माहिती मिळते. आणि ते शोधण्यासाठी तुम्हाला दुसरीकडे जावे लागत नाही. ChatGPT हे टूल OpenAI ने विकसित केले आहे. आता हेच चॅटजीपीटी टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात हे माध्यम गेमचेंजर ठरणार आहे. मात्र चॅटजीपीटी हे सर्वच वापरांसाठी योग्य चॅटबॉट नसू शकते. येथे चॅटजीपीटीचे काही प्रकार आहेत. ज्यात कोडिंग, लिखाण आणि भाषेचे शिक्षण हे सुद्धा समाविष्ट आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Replika : तुमचा AI मित्र

तुम्ही शोधात असलेल्या पर्यायांमध्ये रिप्लिका हा तुमच्यासाठी एक चांगला चॅटजीपीटीचा पर्याय आहे. रिप्लिका हा एआय चॅटबॉट आहे. ज्यात स्क्रिप्टेड कंटेंटसह न्यूरल नेटवर्क मशीन मॉडेल म्हणून एकत्रित काम करतात. रिप्लिका आपला दररोजचा दिवस, आवडीनिवडी आणि आपल्या जीवनाबद्दल माहिती देऊन आपल्याला प्रोत्साहन व पाठिंबा देऊ शकत नाही. यावर फक्त मेसेजेस नाहीतर व्हिडीओ कॉल्स करता येतात. रिप्लिका तुम्ही गुगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅप स्टोअरवरून तुम्ही डाउनलोड करू शकता.

हेही वाचा : Whatsapp च्या मेसेजला उत्तर द्यायचंय? आले ‘हे’ नवीन भन्नाट फीचर, जाणून घ्या

तुमचे इंग्रजी सुधारण्यासाठी ELSA चा वापर करावा

एल्सा हा इंग्रजी भाषेमध्ये बोलणारा एक चॅटबॉट आहे. युजर्स आपले इंग्रजी भाषा व त्यातील उच्चार सुधारण्यासाठी हे चॅटबॉट आहे. हे माध्यम इंग्रजी बोलणाऱ्या लोकांचे व्हॉइस डेटा वापरून विकसित करण्यात आले आहे. एक एकदा वापरण्यास सुरुवात केली की हे तुमची भाषेची समज किती आहे ते तपासेल आणि मग तुमचे इंग्रजी सुधारण्यासाठी तुम्हाला ते मदत करेल. हे तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरून आणि Apple च्या अ‍ॅप स्टोअरवरून डाउनलोड करू शकता.

कोडिंगसाठी Codegen AI हे वापरा

याच्या यावरून तुम्ही हे कसले चॅटबॉट आहे ते ओळखले असेल. यावर तुम्ही एका प्रोग्रामिंग भाषेतून दुसऱ्या प्रोग्रामिंग भाषेत भाषनंतर करू शकता. तसेच तो कोडींगचे अर्थपूर्ण स्पष्टीकरणसुद्धा तुम्हा देतो.codegen Ai हे सध्या फक्त टेक्निकल प्रिव्हयु हणूनच युजर्ससाठी उपलब्ध आहे.

हेही वाचा : Airtel Recharge Plan: एअरटेलने आणला सर्वात स्वस्त प्लॅन; ३५ रुपयांत मिळणार ‘इतका’ जीबी डेटा

क्रिएटिंग कंटेंट तयार करण्यासाठी Writesonic AI हे वापरा

Writesonic AI हे एक चॅटबॉट असून याचा वापर तुम्ही तुम्ही सोशल मीडियाचे कॅप्शन , ब्लॉग , पोस्ट , प्रेस रिर्लीज , जाहिरात यासाठीच कोणत्याही प्रकारचा मजकूर तयार करण्यासाठी करू शकता.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Users looking for chatgpt alternative should use replika elsa codegen writesonic ai tmb 01
First published on: 16-01-2023 at 09:45 IST