सर्च इंजिन गूगलच्या मदतीने एखादी माहिती शोधण्यास किंवा एखाद्या शब्दाचा अर्थ समजून घेण्यास मदत होते. तसेच शाळेतील प्रकल्प, नोकरीसाठी मुलाखत कशी द्यायची याच्या टिप्स, तसेच हॉटेल किंवा एखादे मंदिर किती वाजपेर्यंत चालू असेल आदी तुम्हाला आवश्यक असणारी माहितीदेखील ‘गूगल सर्च’मध्ये संबंधित काही शब्द लिहिल्यावर तुम्हाला काही सेकंदांत तुमच्या मोबाईल स्क्रीनवर दिसते.

तर आता गूगल सर्च इंजिन युजर्ससाठी एक फीचर घेऊन येत आहे. या फीचरचे वैशिष्ट्य म्हणजे गूगलवर सर्च केलेल्या माहितीखाली युजरसुद्धा कमेंट करू शकणार आहेत. अशा या भन्नाट फीचरचे नाव आहे ‘नोट्स’ (Notes). अधिक व अचूक माहिती देणारे लोक आणि तज्ज्ञ अशा दोन्ही प्रकारच्या समविचारी लोकांकडून माहिती मिळवण्याच्या उद्देशाने गूगलने ‘नोट्स’ (Notes) हे फीचर तयार केले आहे. परंतु, कोणतीही आक्षेपार्ह कमेंट, वाईट, खोटी माहिती या नोट्समध्ये कोणीही सहजपणे पोस्ट करू शकणार नाही. त्या दृष्टीने गूगलने असे सांगितले आहे की, केवळ सुरक्षित, उपयुक्त व संबंधित माहितीच नोट्समध्ये युजर पोस्ट करू शकतील.

हेही वाचा…आता इन्स्टाग्रामवर ‘क्लोज फ्रेंड्स’ लिस्टसह ‘या’ गोष्टीसुद्धा होणार शेअर… पाहा काय होणार बदल

नोट्स हे फीचर वापरात आणण्यापूर्वी गूगलकडून या सगळ्या महत्त्वपूर्ण गोष्टी लक्षात घेतल्या जाणार आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे गूगलवर तुम्ही सर्च केलेल्या प्रत्येक विषयासाठी नोट्स हे फीचर उपलब्ध होणार नाही. याबाबत गूगलने सांगितले आहे की, फक्त फॅशन, ट्रॅव्हल, व्हिडीओ गेम अशा विविध संवेदनशील विषयांसाठी ‘नोट्स’ उपलब्ध असेल.

गूगलवर युजर्ससाठी नोट्स पर्याय कुठे उपलब्ध असेल?

१. तुमच्या मोबाईल फोनमधील गूगल या ॲपवर जा.
२. तिथे एखादी गोष्ट सर्च (Search) करा.
. तिथे तुम्हाला तुम्ही सर्च केलेल्या विषयानुसार खाली माहिती आलेली दिसेल.
४. सुरुवातीला दिसणाऱ्या लेखाखाली तुम्हाला नोट्स (Notes) असा पर्याय लवकरच दिसू लागेल.
. या पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्ही त्या फोटो किंवा माहितीविषयी तुमचे मत ‘नोट्स’मध्ये लिहू शकता.
६. तसेच या ‘नोट्स’मध्ये तुम्ही वेगवेगळ्या थीम (Theme), स्टिकर्स (Stickers), पोस्टरसह (Poster) पोस्ट करू शकता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सर्व लॅब प्रयोगांबरोबरीने हे फीचर वापरकर्त्यांपर्यंत पोहोचवण्यापूर्वी हे फीचर कशा प्रकारे काम करू शकेल ते तपासण्यासाठी आम्ही काही कालावधी घेऊ, असे गूगलने स्पष्ट केले आहे.