scorecardresearch

आता इन्स्टाग्रामवर ‘क्लोज फ्रेंड्स’ लिस्टसह ‘या’ गोष्टीसुद्धा होणार शेअर… पाहा काय होणार बदल

मेटा मालिकेचे इन्स्टाग्राम ॲप लवकरचं एक भन्नाट उपडेट घेऊन येणार आहे.

Now reel and posts will also be shared with close friends list on Instagram
(सौजन्य: लोकसत्ता.कॉम) आता इन्स्टाग्रामवर 'क्लोज फ्रेंड्स' लिस्टसह 'या' गोष्टीसुद्धा होणार शेअर… पाहा काय होणार बदल

इन्स्टाग्राम (Instagram) हे तरुण मंडळींमधील अगदीच लोकप्रिय प्लॅटफॉर्म. फोटो, रील, स्टोरी आदी गोष्टी पोस्ट करण्यासाठी प्रसिद्ध असलेलं हे प्लॅटफॉर्म दिवसेंदिवस नवनवीन उपडेट (Update ) वापरकर्त्यांसाठी घेऊन येत आहे. तर आता मेटा मालिकेचे इन्स्टाग्राम ॲप लवकरचं एक भन्नाट उपडेट घेऊन येणार आहे. मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम ब्रॉडकास्ट चॅनेलवर या खास गोष्टीची घोषणा केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर तुमच्या जीवनातील खास गोष्टी निवडक लोकांसोबत शेअर करण्यासाठी एक नवीन पर्याय घेऊन येते आहे. इन्स्टाग्राम वापरकर्त्यांना आतापर्यंत त्यांच्या स्टोरी (Instgaram Story) आणि नोट्स (Notes) पर्यंत ‘क्लोज फ्रेंड्स’ (Close Friends) हा पर्याय उपलब्ध होता. तर आता क्लोज फ्रेंड्स या पर्यायाचा उपयोग तुम्ही तुमच्या पोस्ट आणि रील व्हिडीओ शेअर करताना सुद्धा करू शकणार आहात. यामुळे इन्स्टाग्राम आणखीन खासगी (Private ) होणार आहे.

इन्स्टाग्राम ॲपवर जेव्हा आपण एखादी स्टोरी शेअर करतो तेव्हा तिथे तुम्हाला “तुमची स्टोरी” (Your Story) आणि “क्लोज फ्रेंड्स” (Close Friends) असे दोन पर्याय दिसतात. तर (Close Friends) या पर्यायात काही निवडक इन्स्टाग्राम युजरची यादी असते. यात तुमच्या आवडत्या इस्टाग्राम युजर्सचा समावेश तुम्ही करू शकता. यासाठी तुम्ही स्टोरी शेअर करण्यापूर्वी स्क्रीनच्या डाव्या बाजूच्या सेटिंगच्या (Setting) एका वर्तुळाकार चिन्हावर क्लिक करा, तर तिथे (Story) हा पर्याय दिसेल. या पर्यायावर तुम्ही क्लिक केलात की, विइविंगमध्ये (Viewing) हाईड स्टोरी फ्रॉम (Hide Story From ) असा मजकूर लिहिलेला दिसेल. तर या मजकुराच्या अगदीच खाली शून्य माणसं (0 people) असे लिहिलेले दिसेल, यावर तुम्ही क्लिक करा. यात तुम्हाला इन्स्टाग्राम अकाउंटवर तुमच्या फॉलोवर्सची एक यादी दिसेल. या यादीतून तुम्ही तुमच्या व्यक्तींना, मित्र-मैत्रिणींच्या नावांवर क्लिक करा आणि डनवर (Done) क्लिक करा. मग या सर्व तुमच्या खास व्यक्ती क्लोज फ्रेंड्स या (Close Friends) यादीत तुम्हाला दिसतील.

Startup Valuation Many Other Types
Money Mantra : युनिकॉर्न व्यतिरिक्त इतर अनेक प्रकारचे स्टार्टअप, जाणून घ्या ‘हेक्टोकॉर्न’ म्हणजे काय?
Weight loss eating habits Why meal timing needs to be matched with what you eat
नाश्ता किंवा जेवणाची योग्य वेळ कोणती? वजन कमी करण्यासाठी काय करावे?
Jalandhar News
पोलीस वाहनात बनवला अश्लील रील, VIDEO व्हायरल होताच अधिकाऱ्याचं निलंबन; नेमकं काय घडलं वाचा!
vivo t2 pro launch india with bank offers
VIDEO: भारतात लॉन्च झाला विवोचा ‘हा’ स्मार्टफोन; २ हजारांचा इन्स्टंट डिस्काउंट आणि…, फीचर्स एकदा बघाच

हेही वाचा…चांद्रयान ३ बाबत इस्रोकडून मोठी अपडेट, रॉकेटचा ‘हा’ महत्त्वाचा भाग पृथ्वीच्या कक्षेत परतला!

तर आता खास मित्र-मैत्रिणींबरोबर (Close Friends) इन्स्टाग्रामवर रील व्हिडीओ आणि पोस्ट कशी शेअर करावी?

१. इन्स्टाग्राम ॲप ओपन करा.
२. तुम्ही एडिट केलेला रील व्हिडीओ किंवा फोटो तुम्हाला पोस्ट करायचा आहे तो निवडा.
३. त्यानंतर फोटो किंवा रील व्हिडीओ शेअर करण्यापूर्वी तुम्हाला तिथे एक पर्याय दिसेल. हा पर्याय प्रेक्षक (Audience) असे लिहिलेला असेल.
४. तर प्रेक्षक (Audience) यावर क्लिक केल्यावर तुम्हाला आणखीन दोन पर्याय दिसतील. त्यातील एक पर्याय म्हणजे सगळ्यांना (Everyone) ; या पर्यायावर क्लिक केल्यावर सगळ्यांना तुमची पोस्ट किंवा रील दिसेल. तर दुसरा पर्याय म्हणजे तुमचे खास मित्र-मैत्रिणी (Close Friends) हा पर्याय हिरव्या रंगाचा आहे. जर तुम्ही दुसरा पर्याय क्लिक केलात, तर तुमचा रील व्हिडीओ आणि फोटो फक्त तुमच्या खास मित्र-मैत्रिणींनाच दिसेल.
५. तर क्लोज फ्रेंड्स (Close Friends) हा पर्याय निवडून तुम्ही डन (Done) वर क्लिक करा आणि मग फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करा.
तर इन्स्टाग्रामच्या या नवीन फिचरमुळे तुम्ही तुमचे खासगी फोटो आणि व्हिडीओ फक्त आवडत्या व्यक्तींबरोबर शेअर करू शकणार आहात.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Now reel and posts will also be shared with close friends list on instagram asp

First published on: 17-11-2023 at 14:17 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×