सध्याचा काळ हा सोशल मीडियाचा काळ आहे. प्रत्येक जण सोशल मीडियाचा वापर करत असतो. तसेच काही प्लॅटफॉर्मवरून आपल्याला पैसे देखील कमवता येतात. यामध्ये You Tube हे असे एक प्लॅटफॉर्म आहे जिथे आपण आपले व्हिडीओ, शॉर्ट्स अपलोड करू शकतो. तिथे अनेक चॅनेल्स आपल्याला पाहायला मिळतात. युट्युबवर आपण गाणी देखील ऐकत असतो. मात्र आता तुम्हाला गाणे शोधताना गाण्याचे बोल आठवत नसतील तर चिंता करण्याची गरज नाहीये. आता तुम्ही गाण्याची ट्यून गुणगुणत युट्युबवर गाणे शोधू शकणार आहात. युट्युब आपल्या वापरकर्त्यांसाठी एक नवीन फिचर घेऊन येत आहे. अनेकदा असे होते की आपण एखादे गाणे ऐकतो जे आपल्याला खूप आवडते. मात्र ते आपण आपल्या प्ले लिस्टमध्ये जोडणे विसरतो. त्यामुळे काही दिवसांनी ते गाणे पुन्हा ऐकायचे असते तेव्हा गाण्याचे बोल आठवत नाहीत, फक्त सूर आठवतात.
युट्युब अशा स्थितीमध्ये आपल्या वापरकर्त्यांना गाणी शोधण्यासाठी मदत करणार आहे. लवकरच तुम्हाला गाण्याचे बोल गुणगुणून तुम्हाला हवे असलेले अचूक गाणे शोधू शकाल. YouTube सध्या या फीचरचे टेस्टिंग करत आहे. सर्वांसाठी रोलआऊट करण्यापूर्वी काही निवडक अँड्रॉइड वापरकर्ते त्याचे टेस्टिंग करू शकतील. गुगल त्याच्या व्हिडीओ शेअरिंग App युट्युबच्या वापरकर्त्यांना त्यांना हवी असलेली गाणी शोधण्यासाठी ट्यून रेकॉर्ड करण्याची परवानगी देखील देऊ शकते.
एका पोस्टमध्ये युट्युबने म्हटले आहे की, ”तुम्ही प्रयोगकर्ते असाल तर तुम्ही युट्युब व्हॉइस सर्चमधून नवीन गाणी सर्च फीचरमध्ये टॉगल करू शकता. तसेच गाणी ओळखण्यासाठी तुम्ही ३ + सेकंदासाठी गाणे गुणगुणू शकता किंवा रेकॉर्ड करू शकता.” २०२० मध्ये गुगलने त्याच्या गुगल सर्च विजेट आणि गुगल असिस्टंटवर एक असेच फंक्शन लॉन्च केले होते. TechCrunch च्या एका रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले की त्यावेळी लोकांना सुमारे पंधरा सेकंद गाण्याची ट्यून गुणगुणावी लागत असते.
गुगल आणि युट्युब हे दोघेही हे फिचर सुरू करण्यासाठी मशीन लर्निंग (ML) टेक्नॉलॉजीचा फायदा घेत आहेत. युट्युबवर गाणे ओळखल्यानंतर ते वापरकर्त्यांना संबंधित अधिकृत म्युझिक कंटेंट , वापरकर्त्यांद्वारे तयार करण्यात आलेले व्हिडीओ किंवा सर्च केले जाणारी गाणी शॉर्ट्सवर रिडायरेक्ट करेल. अशी म्युझिक ओळखणारी फीचर्स SoundHound आणि MusicMatch सारख्या थर्ड पार्टी अॅप्सवर देखील उपलब्ध आहेत. मात्र युट्युबवर येणारे हे फिचर सुमारे २.७ बिलियन म्हणजे सुमारे २७० कोटी वापरकर्ते वापरू शकणार आहेत.