Vivo V27 Pro launch: भारतामध्ये सध्या अनेक नवनवीन मोबाईल फोन लॉन्च होत आहेत. सॅमसंग, अॅप्पल, रियलमी यांसारख्या टेक कंपन्या या क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये विवो या कंपनीने भारतामध्ये ग्राहकवर्ग तयार केला आहे. थोड्याच कालावधीमध्ये या कंपनीने भारतीय ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. १ मार्च २०२३ मध्ये विवो वी २७ प्रो हा नवा स्मार्टफोन लॉन्च होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या संबंधित विवो कंपनीने नुकतीच घोषणा केली आहे.
विवो कंपनीच्या घोषणापत्रकामध्ये, वी २७ सीरिज १ मार्च रोजी दुपारी १२ वाजता लॉन्च होणार आहे. त्याचवेळी या स्मार्टफोनच्या सीरिज जगभरामध्ये रिलीज केले जाणार आहे. 120 HZ, 3D कर्व्ह डिस्प्ले आणि 7.4 mm आकारमान असे खास फिचर्स असलेल्या या मोबाईलफोनबाबत लोकांमध्ये खूप उत्सुकता आहे. फ्लिपकार्टच्या सेलमध्ये या फोनचा समावेश केला जाणार आहे असे म्हटले जात आहे. विवो कंपनीच्या या लेटेस्ट स्मार्टफोनची किंमत ३५ ते ४० हजारांच्यामध्ये असल्याचा अंदाज लावला जात आहे.
पेड सबस्क्रिप्शनशिवाय Twitter Account करता येणार सुरक्षित, फॉलो करा ही ट्रिक
Vivo V27 Pro चे नवे फिचर्स:
विवो वी २७ प्रोमध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि HDR10+ सपोर्ट असण्याची शक्यता आहे. त्यासह 6.7-इंच फुल HD+ रिझोल्यूशन, AMOLED डिस्प्ले ही या फोनची खासियत असणार आहे. फोनमध्ये MediaTek Dimensity 8200 चिपसह octa-core CPU असणार आहे. Android 13 आधारित Funtouch OS 13 चा समावेश विवोच्या या नव्या फोनमध्ये असणार आहे. त्याव्यतिरिक्त 50 MP Main कॅमेरा, 50 MP सेल्फी कॅमेरा, 120 डिग्री FOV, 8MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा देखील विवो वी २७ प्रोमध्ये समाविष्ट आहे. इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट रीडर आणि 66W जलद चार्जिंग सपोर्ट आणि 4,600mAh बॅटरी या फोनमध्ये दिसणार असल्याचा अंदाज लावला जात आहे.