scorecardresearch

Vodafone-Idea Recharge Plan: वोडाफोन-आयडियाने लॉन्च केला ३० दिवसांचा प्रीपेड प्लॅन, २५ जीबी डेटा आणि…

VI 296 Prepaid Plan: देशात सध्या Reliance jio , Airtel आणि Vodafone-Idea या आघाडीच्या तीन प्रमुख टेलिकॉम कंपन्या आहेत.

VI prepaid mobile recharge pack
व्होडाफोन आयडिया २९६ प्लॅन (Image credit -VI)

Vodafone Idea Mobile Recharge Plan: देशात सध्या Reliance jio , Airtel आणि Vodafone-Idea या आघाडीच्या तीन प्रमुख टेलिकॉम कंपन्या आहेत. VI कंपनी जिओ आणि एअरटेल प्रमाणे देशामध्ये ५ जी सर्व्हिस देत नाही. मात्र व्हीआय कंपनी आपल्या प्रीपेड सेगमेंटमध्ये काही बदल करत आहे. जिओ आणि एअरटेलच्या मानाने Vi चे वापरकर्त्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात नाही आहे. त्यामुळे वोडाफोन-आयडियाची आपल्या ग्राहकांची संख्या वाढावी म्हणून ३० दिवस वैधता असणारा प्रीपेड प्लॅन लॉन्च केला आहे.

वोडाफोन-आयडियाने आणलेला ३० दिवसांच्या वैधतेचा प्रीपेड प्लॅन हा २९६ रुपयांचा आहे. रिलायन्स जिओ आणि एअरटेलकडे २९६ रुपयांचे प्लॅन आधीपासूनच उपलब्ध आहेत. Vodafone Idea च्या २९६ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये तुम्हाला २५ जीबी डेटा देण्यात आला आहे. तसेच या प्लॅनची वैधता ही पूर्ण महिना म्हणजेच ३० दिवसांसाठी असणार आहे. वापरकर्त्यांना या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि १०० एसएमएस दररोज करता येणार आहेत. या प्रीपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना Vi म्युझिक आणि टीव्ही अ‍ॅपवर मोफत प्रवेश मिळतो.

हेही वाचा : Reliance Jio Plan: जिओच्या ‘या’ प्लॅनमध्ये मोफत बघता येणार Netflix आणि Prime Video, जाणून घ्या

२९६ रुपयांच्या प्रीपेड प्लॅन व्यतिरिक्त Vodafone कडे ३०-३१ दिवसांच्या वैधतेसह आणखी २ रिचार्ज प्लॅन आहेत. १९५ रुपयांच्या वोडाफोनच्या प्लॅनमध्ये ३ जीबी डेटा , अनलिमिटेड कॉलिंग आणि १ महिन्यात ३०० एसएमएस करता येतात. तर याशिवाय ३१९ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये कंपनी आपल्या ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि २ जीबी डेटा ऑफर करते. तसेच दररोज १०० एसएमएस करता येतात. या प्लॅनमध्ये डेटा डिलाइट्स, वीकेंड डेटा रोलओव्हर सुविधा, Vi मुव्ही आणि टीव्ही अ‍ॅपवर मोफत प्रवेश मिळतो.

२९६ रुपयांच्या प्लॅनमध्ये कोणती कंपनी देतेय जास्त फायदे ?

Jio, Airtel आणि Vodafone-Idea च्या 296 रुपयांच्या रिचार्ज पॅकमध्ये ३० दिवसांसाठी २५ जीबी डेटा वापरकर्त्यांना मिळतो. मात्र एअरटेल आणि जिओच्या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना कॅशबॅक, विंक म्युझिक अ‍ॅपचे मोफत सब्स्क्रिप्शन आणि जिओ अ‍ॅप यांसारखे अतिरिक्त फायदे मिळतात. याशिवायचं वोडाफोन-आयडियामध्ये ४जी सेवा मिळते. तर एअरटेल आणि जिओच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना ५ जी सर्व्हिस वापरायला मिळते.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-03-2023 at 10:21 IST
ताज्या बातम्या