WhatsApp Chat Transfer Update: व्हॉट्सअ‍ॅप हे सध्याचे सर्वात वापरले जाणारे सोशल मीडिया अ‍ॅप आहे. ते अ‍ॅप्लिकेशन मेटा या मल्टिनॅशनल टेक कंपनीच्या अंतर्गत येते. ग्राहकांच्या सोयीसाठी मेटाद्वारे व्हॉट्सअ‍ॅपमध्ये नवनवीन बदल केले जातात. व्हॉट्सअ‍ॅप पहिल्या क्रमांक राहावे यासाठी मेटा हे अ‍ॅप सतत अपडेट करत असते. अशाच एका नव्या व्हॉट्सअ‍ॅप अपडेटची चर्चा आहे. या अपडेटमुळे व्हॉट्सअ‍ॅपमध्ये केलेले चॅट्स एका डिवाइसमधून दुसऱ्या डिवाइसमध्ये ट्रान्सफर करणे शक्य होणार आहे. काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅपने असेच एक फीचर लॉन्च केले होते, ज्याच्या मदतीने एक व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट चार स्मार्टफोनमध्ये वापरता येणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप चॅट ट्रान्सफर फीचर

WeBetaInfo यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअ‍ॅपमध्ये नवीन चॅट ट्रान्सफर फीचर सुरु केले जाणार आहे. यामध्ये गुगल ड्राईव्हच्या माध्यमातून यूजरला एका मोबाइल डिवाइसमधील चॅट हिस्ट्री दुसऱ्या डिवाइसमध्ये ट्रान्सफर करता येणार आहे. रिपोर्ट अनुसार, व्हॉट्सअ‍ॅप बीटा टेस्टर्ससाठी Android 2.23.9.19 अपडेट असलेल्या स्मार्टफोनमध्ये हे फीचर उपलब्ध करण्यात आले आहे. या नव्या फीचरमुळे व्हॉट्सअ‍ॅप डेटाचा गुगल ड्राइव्हवर बॅकअप ठेवण्याची गरज भासणार नाही असे म्हटले जात आहे.

आणखी वाचा – गुगलने का हटवले ३,५०० इंडियन पर्सनल लोन अ‍ॅप्स? जाणून घ्या या निर्णयामागील खरं कारण

व्हॉट्सअ‍ॅपच्या या नव्या फीचरचा वापर करण्यासाठी यूजर्सना त्यांच्या स्मार्टफोनमधील सेटिंग्समध्ये काही बदल करावे लागतील. चॅट ट्रान्सफर फीचर वापरण्यासाठी यूजर्सना Google Play Store पर उपलब्ध Android 2.23.9.19 साठीचा व्हॉट्सअ‍ॅप बीटा लेटेस्ट वेरिएंट डाउनलोड करावा लागेल. हा अपडेट इन्स्टॉल केल्यानंतर यूजर व्हॉट्सअ‍ॅपच्या सेटिंग्समध्ये जाऊन चॅट ट्रान्सफर फीचर वापरु शकतात. हे फीचर वापरताना व्हॉट्सअ‍ॅपमधील क्यूआर कोड स्कॅन करावा लागेल. हे फीचर सध्या काही ठराविक लोक वापरु शकतात असे म्हटले जात आहे.