scorecardresearch

WhatsApp Update: व्हाट्सअ‍ॅप ग्रुप्सवर नियंत्रण ठेवणं होणार सोप्पं; अ‍ॅडमिनमच्या मंजुरीशिवाय…

वापरकर्त्यांच्या सोयीसाठी व्हाट्सअ‍ॅप नवनवीन अपडेट आणि फीचर्स लॉन्च करत असते.

whatsapp launch news update for group admins
व्हॉट्सअ‍ॅप (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

व्हाट्सअ‍ॅप हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. हे मेटाच्या मालकीचे असून याची सुरुवात २०११ मध्ये झाली होती. वापरकर्त्यांच्या सोयीसाठी व्हाट्सअ‍ॅप नवनवीन अपडेट आणि फीचर्स लॉन्च करत असते. या अपडेटमुळे व्हाट्सअ‍ॅपवर चॅटिंग करताना वापरकर्त्यांना एक नवीन आनंद मिळतो. रिपोर्टनुसार मेसेजिंग व्हाट्सअ‍ॅप ची मूळ कंपनी Meta एका नवीन फिचरवर काम करत आहे. या फीचरमुळे व्हाट्सअ‍ॅपच्या ग्रुप अ‍ॅडमीनला काही फायदे मिळणार आहेत.

व्हाट्सअ‍ॅपच्या नवीन अपडेट्स आणि फीचर्स लक्ष ठेवणाऱ्या WABetaInfo या वेबसाइटने व्हाट्सअ‍ॅपच्या आगामी फिचर बद्दल माहिती दिली आहे. त्यानुसार ग्रुप अ‍ॅडमीनसाठी नवीन approval फिचर आणत आहे. या फीचरमुळे अ‍ॅडमीनला कोणत्या प्रकारची ताकद प्राप्त होणार आहे हे आपण जाणून घेऊयात.

हेही वाचा : Meta चा मोठा निर्णय! खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी टाळेबंदीनंतर ‘या’ कंपनीची करणार विक्री

iOS आणि Android साठी WhatsApp बीटाच्या नवीन फीचरमुळे अ‍ॅडमीनला ग्रुपमधील सदस्यांची संख्या कंट्रोल करण्यास मदत करते. हे फिचर आल्यावर ग्रुप चॅटमध्ये वापरकर्त्यांना एक मेसेज दिसणार आहे तो म्हणजे, नवीन लोकांना ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी ग्रुप अ‍ॅडमीनकडून परवानगी घ्यावी लागणार आहे. ग्रुपची लिंक असली तरीदेखील अ‍ॅडमीनकडून परवानगी घ्यावी लागणार आहे. म्हणजेच वापरकर्त्यांना ग्रुप अ‍ॅडमिनच्या परवानगीशिवाय ग्रुपमध्ये अ‍ॅड होता येणार नाही.

ग्रुपमधील नवीन सदस्यांना मंजुरी देण्याचा पर्याय खरोखरच अ‍ॅडमिनसाठी चांगला आहे. त्यांना ग्रुपमध्ये कोण असणारे हे कंट्रोल करायचे आहे. नवीन सेटिंग्स पाहण्यासाठी ग्रुप सेटिंगमध्ये जावे. तिथे तुम्हाला ‘Approve New Participants’ नावाचा पर्याय मिळेल. तो पर्याय चालू करून तुम्ही ग्रुपला चांगल्या प्रकारे कंट्रोल करू शकता.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-03-2023 at 09:47 IST
ताज्या बातम्या