जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप्समध्ये व्हॉट्सअ‍ॅपचा समावेश होतो. व्हॉट्सअ‍ॅप आपल्या यूजर्ससाठी वेळोवेळी नवनवीन फीचर्स लाँच करत असतं.  Meta च्या मालकीचे मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअॅप लवकरच अँड्रॉइड यूजर्ससाठी आपल्या इंटरफेसच्या डिझाइनमध्ये बदल करणार आहे. या बदलामध्ये व्हॉट्सअॅपच्या डिझाईनसोबतच रंगांमध्येही बदल होणार आहेत. याशिवाय, मेटा व्हॉट्सअॅपच्या काही मेनूमध्ये बदल देखील करू शकते, अशीही माहिती आहे.

WaBetaInfo ने शेअर केलेल्या स्क्रीनशॉटनुसार, WhatsApp मेसेजिंग अॅपच्या UI मध्ये बदल करेल. यानुसार व्हॉट्सअॅपच्या तळाशी स्टेटस, चॅट आणि इतर टॅबसारखे नेव्हिगेशन बार ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय व्हॉट्सअॅपने कम्युनिटी टॅबला एक नवीन स्थान दिले आहे. यासोबतच अॅपच्या वरच्या भागातून हिरवा रंग काढून टाकला जाईल.

(हे ही वाचा : व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी मोठी बातमी! २४ ऑक्टोबरनंतर ‘या’ स्मार्टफोन्सवर चालणार नाही अ‍ॅप; काय आहे कारण?)

हिरवा रंग बदलेल का?

अहवालानुसार, हिरवा रंग तोच राहील पण हलक्या रंगामध्ये असेल. त्याचबरोबर अँड्रॉईड अॅपमध्ये तळाशी लिहिलेले व्हॉट्सअॅप पांढऱ्याऐवजी हिरवे होईल. यासोबतच मेसेज बटण उजव्या बाजूला खाली सरकले जाईल. याशिवाय, शीर्षस्थानी काही फिल्टर बटणे दिसतील ज्यात सर्व, न वाचलेले, वैयक्तिक आणि व्यवसाय समाविष्ट असतील. या फिल्टर्सद्वारे तुम्हाला मेसेज सहज शोधता येतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हॉट्सअॅपच्या नवीन रीडिझाइनमध्ये अँड्रॉइड बीटा व्हर्जन २.२३.१३.१६ प्रदान करण्यात आला आहे. नवीन UI वैशिष्ट्य अद्यतनामध्ये मटेरियल डिझाइन 3 UI समाविष्ट आहे. अशा परिस्थितीत व्हॉट्सअॅपमध्ये इतरही अनेक बदल पाहायला मिळू शकतात, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. जेव्हा सर्व बदल बीटा आवृत्तीमध्ये केले जातात आणि योग्यरित्या चाचणी केली जातात तेव्हाच ते WhatsApp च्या स्थिर आवृत्तीमध्ये आणले जातील.