Whatsapp image blur tool : व्हॉट्सअ‍ॅप काही बिटा युजर्सना इमेज ब्लर करण्याचे फीचर देत आहे. वाबेटाइन्फोच्या अहवालानुसार, काही डेक्सटॉप बिटा युजर्सना व्हॉट्सअ‍ॅप हे फीचर वापरू देत आहे. या फीचरच्या सहायाने वापरकर्त्याला छायाचित्रातील संवेदनशील माहिती ब्लर करून गुप्त ठेवता येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अहवालानुसार, व्हॉट्सॅपने दोन ब्लर टुल्स तयार केले आहेत, ज्याने युजरला पर्यायी ब्लर इफेक्टच्या सहायाने त्यांची इमेज ब्लर करता येणार आहे. युजरला ग्रानुलर प्रेसिशननुसार इफेक्ट लावण्यासाठी ब्लर साइज निवडता येणार आहे. व्हॉट्सअ‍ॅप इमेज ब्लर टूल फीचर पहिल्यांदा या वर्षी जून महिन्यात दिसून आले होते. सध्या हे फीचर काही व्हॉट्सअ‍ॅप डेक्सटॉप बिटा युजर्ससाठी उपलब्ध आहे. भविष्यात हे फीचर मोबाईल युजर्सनाही मिळण्याची शक्यत आहे.

(मायक्रोसॉफ्ट नंतर गुगलही सोडणार साथ, ‘या’ ऑपरेटिंग सिस्टिम्सना मिळणार नाही क्रोम सपोर्ट)

दरम्यान व्हॉट्सअ‍ॅपने अँड्रॉइड बिटा २.२२.२३.१५ अपटेड प्लेस्टोअरवर रिलीज केला आहे. या अपडेटमध्ये कॅप्शनसह मीडिया शेअर करता येणार आहे. छायाचित्र, व्हिडिओ, जीआयएफ आणि डॉक्युमेंट फाइल्स आता कॅप्शनसह शेअर करता येणार आहेत. अँड्रॉइड बिटा युजर्सला तळाशी एक मेसेज बॉक्स दिसून येईल, यामध्ये त्यांना फॉर्वर्ड करणार असलेल्या फाइल्सला कॅप्शन देता येणार. तसेच, युजरला कॅप्शन व्ह्यूमधील डिस्मिस आयकनवर टॅप करून कॅप्शन हटवता देखील येणार.

मंगळवारी ठप्प पडले होते व्हॉट्सअ‍ॅप

जगभरात कोट्यवधी युजर्स असणारे व्हॉट्सअ‍ॅप भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास ठप्प पडले होते. त्यामुळे जगभरातील युजर्समध्ये गोंधळ उडाला होता. एकीकडे काही तांत्रिक बिघाडामुळे व्हॉट्सअ‍ॅप डाऊन झाल्याचे सांगितले जात होते तर दुसरीकडे हा सायबर हल्ला असण्याचीही शक्यता वर्तवली जात होती.

(एलॉन मस्क यांची अनोखी एन्ट्री, ट्विटर मुख्यालयात चक्क नेले सिंक; बायोडेटाही केला अपडेट)

सुरुवातीला काही काळ व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर मेसेजेस पाठवता येत नव्हते. मात्र, काही वेळानंतर पर्सनल चॅटदेखील बंद झाले. पहिल्या अर्ध्या तासातच हजारो युजर्सनी ही समस्या येत असल्याचे ट्विटरवर सांगितले. मात्र, अखेर जवळपास दोन तासांच्या विस्कळीत सेवेनंतर, व्हॉट्सअ‍ॅप पुन्हा पूर्ववत सुरू झाले.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Whatsapp made image blur tool available for desktop beta users ssb
First published on: 27-10-2022 at 18:25 IST