व्हॉट्स अॅपवरून मेसेज पाठवण्याआधी संबंधित व्यक्तिचा नंबर सेव्ह करावा लागतो. मात्र, नंबर सेव्ह न करताही एखाद्याला मेसेज पाठवणं सोपं होणार आहे. कसं ते जाणून घ्या.
व्हॉट्स अॅप मेसेंजर सर्वाधिक लोकप्रिय असणारे अॅप आहे. चॅटिंग शिवाय फोटो, व्हिडीओ शेअरिंगसाठी या अॅपचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. व्हॉट्स अॅपवरून मेसेज पाठवण्याआधी संबंधित व्यक्तिचा नंबर सेव्ह करावा लागतो. मात्र, नंबर सेव्ह न करताही एखाद्याला मेसेज पाठवणं सोपं होणार आहे. गेली अनेक दिवसांपासून व्हॉट्सअॅपचं यावर काम सुरू आहे. त्यामुळे आता तुम्हाला कोणता एखादा नवीन नंबर फोनमध्ये सेव्ह न करता थेट व्हॉट्सअॅपवर चॅट करता येणार आहे.
WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, WhatsApp ने नवीन बीटा अपडेट आणण्यास सुरुवात केली आहे. अँड्रॉइड यूजर अपडेटने अॅपचे वर्जन 2.22.8.11 आणलं आहे. अपडेटसह Facebook प्रोप्रायटरी प्लॅटफॉर्म तुम्हाला चॅट बबलमध्ये फोन नंबर निवडताना काही शॉर्टकट दिसणार आहेत. रिपोर्टमध्ये शेअर केलेल्या स्क्रीनशॉट्सनुसार, WhatsApp Android युजर्सना नवीन ऑप्शन दाखवतं. उदाहरणार्थ अॅड कॉन्टॅक्ट्स आणि बीटा अपडेटनंतर पोस्ट करा. अहवालात पुढे म्हटले आहे की जर तुम्ही टॅप केलेला फोन नंबर WhatsApp वर उपलब्ध असेल तर प्लॅटफॉर्म तुम्हाला त्या सेव्ह न केलेल्या फोन नंबरसोबत चॅट सुरू करण्याचा ऑप्शन देखील देईल. जेव्हा फोन नंबर WhatsApp वर उपलब्ध नसतो तेव्हा इतर दोन पर्याय नेहमी दिसतील.
हे फिचर्स फक्त Android युजर्ससाठी उपलब्ध आहे जे WhatsApp बीटा प्रोग्रामचा भाग आहे. कंपनीने अद्याप नवीन फिचर्सबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नसली तरी, भविष्यातील अपडेटमध्ये ते लवकरच दिसतील अशी लोकांना अपेक्षा आहे.
व्हॉट्सअॅपने गेल्या आठवड्यात व्हॉईस मेसेजिंगसाठी अनेक नवीन फीचर्सची घोषणा केली. फेसबुकच्या मालकीच्या प्लॅटफॉर्मचा दावा आहे की या नवीन फिचर्समुळे युजर्सना त्यांचे मित्र आणि कुटुंबीयांशी संवाद साधणे सोपे होईल. यापैकी काही Android आणि iOS प्लॅटफॉर्मवर बीटा परीक्षकांसाठी आधीच उपलब्ध होते. फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये सहा नवीन फिचर्सची घोषणा केली.