WhatsApp हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. ज्यावरून वापरकर्ते एकमेकांशी संवाद साधू शकतात. वापरकर्त्यांसाठी सर्वात जास्त अपडेट्स आणण्यामध्ये व्हॉट्सअ‍ॅप आघाडीवर आहे. आतासुद्धा कंपनी आपल्या वापरकर्त्यांसाठी एक नवीन फिचर घेऊन आली आहे. या फीचरच्या मदतीने वापरकर्त्यांना WhatsApp वर एकाच डिव्हाईसवर अनेक अकाउंट वापरता येणार आहेत. म्हणजेच याचा अर्थ असा होतो की या फीचरच्या मदतीने तुम्ही एकाच मोबाईलवर अनेक अकाउंट वापरू शकणार आहात. त्याच्याआधी कंपनीने एकच अकाउंट दोन डिव्हाईसवर वापरता येईल असे फिचर आणले होते.

मेसेजिंग प्लॅटफॉर्म असणारे व्हॉट्सअ‍ॅप गुगल प्ले बीटा प्रोग्रॅमद्वारे नवीन अपडेट रोलआऊट करण्याची योजना आखत आहे. जे 2.23.13.5 व्हर्जनवर आणले जाऊ शकते. हे मल्टी अकाउंट फिचर भविष्यातील अपडेटमध्ये उपलब्ध होईल. अँड्रॉइड 2.23.13.5 साठी WhatsApp Business बीटामध्ये हे फिचर दिसले. हे Google Play Store वर उपलब्ध आहे. हे फिचर गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. याबाबतचे Financial Express ने दिले आहे.

हेही वाचा : Upcoming SmartPhones: आगामी काळामध्ये लॉन्च होणार ‘हे’ टॉप पाच भन्नाट स्मार्टफोन्स, संपूर्ण यादी एकदा पहाच

व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन अपडेट्सवर लक्ष ठेवणाऱ्या WABetaInfo नुसार, व्हॉट्सअ‍ॅप मेसेंजरसह या फिचरची अनुकूलता सूचित करतात. WABetaInfo नुसार, मेसेजिंग प्लॅटफॉर्म मेनू प्रदान (providing a menu) या फीचरवर काम करत आहे जे वापरकर्त्यांना आपल्या इच्छित अकाऊंटच्या सूचीमधून अकाउंट निवडण्याची परवानगी देईल. जेव्हा वापरकर्ता कोणत्याही विशिष्ट अकाउंटमध्ये लॉग इन करतो आणि तो जोवर त्यातून लॉग आऊट करत नाही तोवर सर्व डेटा डिव्हाईसवर स्टोअर केला जातो.

या फीचरच्या मदतीने वापरकर्ते त्यांचे वैयक्तिक, कामासंबंधी आणि इतर सामाजिक संवाद एकाच App मध्ये करु शकणार आहेत. वापरकर्ते हा फरक राखण्यासाठी सूचना प्रभावीपणे हाताळणे, गोपनीयता टिकवून ठेवणे तसेच अतिरिक्त Apps च्या आवश्यकतेशिवाय अनेक अकाउंट स्विच करू शकणार आहेत. WABetaInfo नुसार, हे फिचर केवळ बिझनेस अ‍ॅपवर पाहिले गेले आहे. मात्र असा हे केवळ त्यासाठी असल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही आहे. हे फिचर कंपनी लवकरच प्रत्येकासाठी उपलब्ध करून देण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : Airtel ने ५६ व ८४ दिवसांसाठी लॉन्च केले ‘हे’ रिचार्ज प्लॅन, दररोज २ जीबी डेटा आणि…

तसेच व्हॉट्सअ‍ॅपने ios आणि android च्या लेटेस्ट बीटा व्हर्जनवर ‘व्हिडीओ मेसेज’ या फीचरचे टेस्टिंग सुरू केले आहे. व्हॉइस मेसेजसप्रमाणे वापरकर्त्यांना हे फिचर व्हिडीओ रेकॉर्ड करणे आणि पाठवणे हा क्विक शॉर्टकट देणार आहे. याच्या मदतीने तुमची चॅट करत असताना एका क्लीकवर व्हिडीओ रेकॉर्ड करून पाठवू शकता. या फीचरमध्ये वापरकर्ते लहान व्हिडीओ रेकॉर्ड करून पाठवू शकतात.