करोडो भारतीय whatsapp हे वापरतात. हे मेटाच्या मालकीचे आहे. यावरून म्हाला एकमेकांशी संवाद साधता येतो. व्हिडीओ कॉलिंग, मेसेजिंग . आपले फोटो, व्हिडीओ शेअर करणे अशा अनेक गोष्टी तुम्हाला करता येतात. व्हाट्सअ‍ॅप हे आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन फीचर्स आणत असते. आतासुद्धा व्हाट्सअ‍ॅप तुमच्यासाठी एक फीचर्स आणणार आहे. त्यावर व्हाट्सअ‍ॅपचे काम सुरु आहे. व्हाट्सअ‍ॅपचे हे नवीन फिचर कोणते आहे व ते कसे वापरायचे हे जाणून घेऊयात.

Webteninfo च्या रिपोर्टनुसार हे फिचर एकदम उपयोगी असणार आहे कारण हे फिचर वापरकर्त्यांना महत्वाचे मेसेज चॅटच्या वर पिन करण्यास परवानगी देणार आहे. मेसेज पिन केलेला असल्यास आणि वापरकर्ता हे व्हाट्सअ‍ॅपची जुनी सिरीज वापरत असेल तर तिथे एक मेसेज दिसेल.तो मेसेज दिसला की त्यांना अ‍ॅप स्टोअरमध्ये जाऊन व्हाट्सअ‍ॅपची नवीन सिरीज अपग्रेड करावी लागणार आहे.

हेही वाचा : WhatsApp Features: व्हाट्सअ‍ॅप कॉलिंगचा वापर करताय? कंपनी तुमच्यासाठी आणत आहे ‘हे’ खास फिचर, जाणून घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लवकरच येणार अपडेट

तसेच याशिवाय पिन केलेल्या मेसेजेसमुळे त्या ग्रुपचमध्ये सुधारणा होईल जे वापरकर्त्यांना महत्वाच्या मेसेजपर्यंत सहजपणे पोचण्याची परवानगी देऊन भरपूर मेसेज प्राप्त करण्यात येतात. एका अहवालानुसार हे फिचर अद्याप सर्वांसाठी लाँच करण्यात आलेले नाही. मात्र ते लवकरच लाँच होईल अशी अपेक्षा आहे.