scorecardresearch

Premium

Overheating Phone : तुमचाही फोन वारंवार गरम होतो का? ‘ही’ असू शकतात कारणे, आजच सावध व्हा!

अनेकदा फोन वापरताना गरम होतो पण हे जर वारंवार होत असेल तर त्यामागील कारणे जाणून घेणे गरजेचे आहे

Why does phone get hot
(फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

माणसाच्या आयुष्यात फोन किंवा मोबाइलने महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे. फोनशिवाय माणूस ही कल्पनाही आपण करू शकत नाही. कधी फोनमध्ये बिघाड झाला की माणसाची अनेक कामे विस्कटतात त्यामुळे फोनची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
अनेकदा फोन वापरताना गरम होतो पण हे जर वारंवार होत असेल तर त्यामागील कारणे जाणून घेणे गरजेचे आहे. Avast.com नी दिलेल्या वृत्तानुसार वारंवार फोन गरम होण्यामागील खालील कारणे आहेत.

१. सूर्यप्रकाशाशी संपर्क

फोन गरम होण्यामागील महत्त्वाचं कारण म्हणजे फोनचा थेट सूर्यप्रकाशाशी संपर्क येणे. जर तुम्ही उन्हात उभे असाल तर त्याचा थेट परिणाम तुमच्या फोनवर होऊ शकतो. तुमचा फोन गरम होऊ शकतो, ज्यामुळे फोन डॅमेज होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…
asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीने कोणते कपडे घालावेत, हे ठरवणारे तुम्ही कोण?

हेही वाचा : ChatGPT वापरून अशी करा कमाई, ‘हे’ आहेत सर्वोत्तम पर्याय

२. ओव्हरलोड सीपीयू

जर तुमच्या फोनचा सीपीयू ओव्हरलोडेड झाला असेल तर तुमचा फोन आतून गरम होऊ शकतो. सीपीयू हा तुमच्या फोनचा एक प्रकारे मेंदू असतो, जो तुमच्या फोनचे ॲप्स आणि इतर गोष्टी सुरळीत चालवतो. पण सीपीयू एकाच वेळी अनेक कामे करत असेल तर ओव्हरलोडिंगमुळे फोन गरम होऊ शकतो.

३. बॅटरी किंवा चार्जर केबल खराब असणे
जर तुमच्या फोनची बॅटरी चांगली नसेल तर याचा थेट परिणाम तुमच्या फोनवर होऊ शकतो. याशिवाय कधी कधी चार्जिंग करतानाही फोन गरम होतो अशा वेळी चार्जर केबल चांगला आहे का, हे तपासणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

४. फोनची ब्राइटनेस आणि वॉलपेपर्स

अनेकदा आपण फोनची ब्राइटनेस खूप जास्त ठेवतो. याशिवाय अनेकांना फोनमध्ये थ्री डी वॉलपेपर ठेवायची सवय असते. यामुळे फोनवर लोड पडतो आणि फोन गरम होतो.

हेही वाचा : UPI पेमेंट करताना फसवणूकीपासून कसे सुरक्षित राहावे? जाणून घ्या ‘या’ सोप्या स्टेप्स

५. खूप वेळापर्यंत मोबाइलवर गेम खेळणे

अनेकांना मोबाइलवर गेम खेळायला आवडते. पण तुम्हाला माहिती आहे का मोबाइलवर गेम खेळल्यामुळे सीपीयूवर थेट परिणाम होतो आणि फोन गरम होतो. तुम्ही एखाद्या वेळी गेम खेळू शकता.

६. जास्त वेळ व्हिडीओ पाहणे

जर तुम्ही मोबाइलवर तासन्-तास व्हिडीओ, चित्रपट, टीव्ही सीरियल्स पाहत असाल तर तुमचा फोन गरम होऊ शकतो. फोनची स्क्रीन जास्त वापरली तर डिव्हाइस गरम करू शकतो.

हेही वाचा : व्हॉट्सअ‍ॅपने iPhone युजर्ससाठी लॉन्च केले ‘हे’ फीचर, आता एकाच वेळी चार आयफोनवर…, जाणून घ्या

७. सॉफ्टवेअर अपडेट्स

जेव्हा फोनमध्ये एखादी सॉफ्टवेअर अपडेट सुरू असते तेव्हा फोन गरम होऊ शकतो. या अपडेटसाठी फोनला अधिक पॉवरची आवश्यकता असते. त्यामुळे फोन गरम होऊ शकतो.

८. व्हायरस

जर तुम्ही एखाद्या चुकीच्या लिंकवर क्लिक केले किंवा एखादे फेक अॅप तुम्ही वापरत असाल तर त्याचा थेट परिणाम तुमच्या फोनच्या सीपीयूवर होतो ज्यामुळे तुमचा फोन गरम होतो.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Why does phone get hot read reasons of overheating phone ndj

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×