scorecardresearch

तुम्ही Xiaomi आणि Redmi चे स्मार्टफोन वापरत आहात? तुमच्यासाठी आले MIUI 14 अपडेट; होणार ‘हा’ मोठा फायदा

Xiaomi कंपनीने या वर्षातील सर्वात मोठ्या मोबाइल शो (MWC 2023) मध्ये आपली Xiaomi 13 ही सिरीज लॉन्च केली आहे.

Xiaomi And Redmi Smartphones miui 14 update news
Xiaomi And Redmi Smartphones- प्रातिनिधिक छायाचित्र /द इंडियन एक्सप्रेस

Xiaomi कंपनीने या वर्षातील सर्वात मोठ्या मोबाइल शो (MWC 2023) मध्ये आपली Xiaomi 13 ही सिरीज लॉन्च केली आहे. यामध्ये कंपनीने तीन नवीन स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. ज्यामध्ये Xiaomi 13, Xiaomi 13 Pro आणि Xiaomi 13 Lite या फोनचा समावेश आहे. यामधील Xiaomi 13 Pro हा फोन अत्यन्त खास संर्टफोन असणार आहे. या तीनही मॉडेलमध्ये तुम्हाला Android 13 वर आधारित MIUI 14 सपोर्ट मिळणार आहे. या नवीन अपडेटमुळे लोकं शाओमीच्या फोनवरून अतिशय कमी वेळात आपल्या फाईल्स ट्रान्सफर करू शकतील. तसेच व डिव्हाईस टेक्स्ट ओळखणे, मोठे फोल्डर्स आणि कमी वापरलेले अ‍ॅप्स ऑप्टिमाइझ करता येईल व त्यामुळे सिस्टीम फास्ट होईल.

शाओमीने Xiaomi 13 सिरीज लॉन्च करून कंपनीने आपल्या स्मार्टफोन्सची लिस्ट जाहीर केली आहे ज्यात कंपनी लवकरच MIUI 14 हे अपडेट देणार आहेत. मार्च महिन्यापासून लोकांना नवीन अपडेट मिळण्यास सुरुवात होणार आहे. एकूण ते १९ स्मार्टफोन्स आहेत ज्यामध्ये वापरकर्त्यांना MIUI 14 चे अपडेट मिळेल. सध्या सुरुवातीच्या टप्प्यात कंपनीने इतकेच फोन निवडले आहेत. नंतर हळूहळू प्रत्येकासाठी MIUI 14 अपडेट दिले जाणार आहे.

हेही वाचा : Tech layoff: नोकर कपातीमध्ये Elon Musk यांच्या निष्ठावंताला देखील गमवावी लागली नोकरी, जाणून घ्या

रेडमीच्या Redmi Note 10 , Redmi 10 5G , Redmi Note 11 Pro+ 5G, Redmi Note 10 Pro या स्मार्टफोन्सवर हे अपडेट मिळणार आहे तर शाओमीच्या Xiaomi 12T Pro ,Xiaomi 12X, Mi 11 Ultra, Mi 11 Lite 5G, Xiaomi 12T, Xiaomi 12 Lite, Mi 11i, Mi 11 Lite, Xiaomi 12 Pro, Xiaomi 11T Pro, Mi 11, Xiaomi 12, Xiaomi 11T, Xiaomi 11 Lite 5G NE या फोन्समध्ये हे अपडेट मिळणार आहे.

नुकत्याच लॉन्च Poco x5pro या स्मार्टफोनमध्ये MIUI 14 अपडेट देण्यात आले आहे. हा स्मार्टफोन दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-02-2023 at 15:51 IST
ताज्या बातम्या