शाओमीचा रेडमी १३C हा फोन ६ डिसेंबर रोजी भारतात लॉंच होणार आहे. रेडमी १३C हा फोन दोन मॉडेल्स म्हणजेच ४G व ५G सोबत लॉंच होणार असल्याची घोषणा ‘शाओमी स्पिन ऑफ रेडमी’ने केली आहे. खरे तर रेडमी १२ ५G प्रमाणे रेडमी १३C ५G देखील भारतात पदार्पण करणार आहे. १३C ४G हा फोन अर्थातच वेगळ्या चिपसह येईल तरीही हा फोन वॉटर डाऊन कॅमेरा सेटअपसोबत येईल, अशी अपेक्षा आहे.

निवडक जागतिक बाजारपेठांमध्ये रेडमी १३C ४G ला आधीच पसंती असल्याचे समजते. तरीही भारतीय बनावटीच्या या मॉडेलमधील चिपला द मीडिया हेलिओ G८५ वरून अधिक शक्तिशाली हेलिओ ९९ हा अपग्रेड मिळणार असल्याची सध्या चर्चा आहे. परंतु, त्याबद्दल कोणतीही खात्रीशीर माहिती नाही.

जागतिक बाजारपेठांमध्ये विक्री होणाऱ्या या रेडमी १३C ४G ला ६.७४ IPS LCD डिस्प्ले असून, ७२०p रिसोल्युशनसोबत ९० Hs चा रिफ्रेश रेट आहे. त्यामध्ये अॅण्ड्रॉइड १३ बेस्ड MIUI हे सॉफ्टवेअर आहे. ५,००० mAh बॅटरी असून, त्याला १८W चा जबरदस्त चार्जिंग सपोर्ट आहे. या फोनमध्ये रेअर ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. ५० मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आणि दुसऱ्या मेगापिक्सेलच्या कॅमेऱ्यास डेप्थ सेन्सर असून, ८ मेगापिक्सेल वॉटर ड्रॉप आकाराचा सेल्फीसाठी फ्रंट कॅमेरा दिलेला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा : ॲपल वॉचची बॅटरी सारखी ड्रेन होत आहे? watchOS 10.1 अपडेट नंतर ‘हे’ जुगाड करून पाहा…

भारताच्या अधिकृत शाओमी वेबसाइटवर खास रेडमी १३C ४G साठी असलेल्या सूचीमध्ये हा फोन स्टार डस्ट ब्लॅक आणि स्टार शाईन ग्रीन अशा दोन रंगांमध्ये उपलब्ध होणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळते. परंतु, या फोनच्या किमतीबाबत शाओमीने “या फोनच्या किमतीचा त्रास तुमच्या बजेटला होणार नाही”, असे मोघमपणे सांगितले आहे. आता या फोन लाँचदरम्यान रेडमी १३C ५G बद्दल अधिक माहिती मिळावी, अशी अपेक्षा केली जात आहे.