Flipkart Irresistible Infinix Days Sale: जर तुम्हाला स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तसेच तुमचे बजेट १० हजारांपेक्षा कमी असेल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. फ्लिपकार्टवर Irresistible Infinix Days सेल तुमच्यासाठी आहे. ७ नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये तुम्ही Infinix Note 12 आणि Infinix Hot 12 Play मोठ्या सवलतींसह खरेदी करू शकता. या स्मार्टफोन्सला तुम्ही १० हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. पाहा डिटेल्स. सेलमध्ये, तुम्ही आकर्षक बँक ऑफरसह हे दोन्ही लोकप्रिय इंफिनिक्स स्मार्टफोन ऑर्डर करू शकता. इतकेच नाही तर हे हँडसेट विक्रीमध्ये जबरदस्त एक्सचेंज बोनससह खरेदी करता येतील. सेलमध्ये या स्मार्टफोन्सवर किती सवलत मिळेल सविस्तरपणे जाणून घेऊया. Infinix Note 12 Infinix च्या या फोनची १५,९९९ रुपये आहे. सेलमध्ये तुम्ही हा फोन ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटरनल स्टोरेज सह ९,९९९ रुपयांना खरेदी करू शकता. Flipkart Axis Bank कार्डद्वारे पेमेंट केल्यावर तुम्हाला ५ टक्के कॅशबॅक मिळेल. तुम्ही एक्सचेंज ऑफरमध्ये फोन घेतल्यास, तुम्हाला जुन्या फोनच्या बदल्यात ९,४५० रुपयांपर्यंतचा फायदा मिळू शकतो. हा फोन ६.७-इंचाच्या फुल एचडी + AMOLED डिस्प्लेसह येतो. प्रोसेसर म्हणून यामध्ये MediaTek Helio G88 चिपसेट देण्यात आला आहे. फोनच्या मागील बाजूस, तुम्हाला ५०-मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिसेल. कंपनी या फोनमध्ये १६ जीबी फ्रंट कॅमेरासह ५०००mAh बॅटरी देत आहे. आणखी वाचा : खुशखबर! सॅमसंगचा ‘हा’ महागडा फोन झाला १० हजार रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या फिचर्स… Infinix Hot 12 Play ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनची ११,९९९ रुपये आहे. Infinix सेलमध्ये, तुम्ही ते २९ टक्के डिस्काउंटनंतर ८,४९९ मध्ये खरेदी करू शकता. तुम्ही फोन खरेदी करण्यासाठी Flipkart Axis Bank कार्ड वापरल्यास, तुम्हाला ५ टक्के कॅशबॅक देखील मिळेल. एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्ही हा फोन ७,७५० रुपयांपर्यंत स्वस्तात मिळवू शकता. Infinix Note 12 Pro 4G मीडियाटेक हीलियो G९९ प्रोसेसर दिले आहे. Helio G९९ चिप ला ६ एनएम प्रोसेस वर बनवले आहे. या फोनचा जास्तीत जास्त क्लॉक स्पीड २.२GHz आहे. या चीपला आर्म माली G५७ GPU सोबत जोडले आहे. या फोनमध्ये ६.७ इंचाचा फुल एचडी प्लस अमोलेड डिस्प्ले दिला आहे. ज्यात ६० हर्ट्ज़ स्क्रीन रिफ्रेश रेट दिला आहे. नोट १२ प्रो २५६ जीबी स्टोरेज सोबत येतो.