Voice typing in pc or laptop : अनेक लोक संगणकावर काम करतात. कहींचे त्यावर टायपींगचे कार्य अधिक असते. यात स्पीड ही महत्वाची बाब आहे. टायपिंगची गती चांगली असल्यास वेळेची बचत होते आणि संगणकावर डेटा देखील लवकर जमा करता येतो. मात्र, टायपिंग स्पीड फार कमी असल्याने काहींना वेळ लागतो. पण, त्यावर एक उपाय आहे. हा उपाय केल्याने वेळेची बचत होऊ शकते.

वॉइस टायपिंगच्या मदतीने तुम्ही लवकर टायपिंग करू शकता. जसे स्मार्टफोनमध्ये गुगल असिस्टंटच्या मदतीने टाइपिंग शक्य आहे, तसेच ते लॅपटॉपमध्ये देखील शक्य आहे. तुम्ही लॅपटॉपमध्ये देखील वॉइस टाइपिंग करू शकता.

पुढील स्टेप्स फॉलो करा.

(REALME 10 Pro + 5G आणि REALME 10 Pro 5G भारतात लाँच; 108 एमपी कॅमेरा, फास्ट चार्जिंग; काय आहे किंमत? जाणून घ्या)

  • लॅपटॉप किंवा संगणकामध्ये वॉइस टायपिंग करण्यासाठी सर्वात आधी गुगल क्रोम ब्राऊजर उघडा.
  • या नंतर गुगल डॉक्स सर्च करून त्यामध्ये लॉगइन करा.
  • लॉगइन केल्यानंतर क्रिएट बटनवर क्लिक करा.
  • येथे गुगल डॉक्सवर क्लिक करून ओके करा.
  • वॉइस टायपिंग करण्यासाठी ctrl+shift+s एकसाथ दाबा.
  • वॉइससाठी परवानगी दिल्यानंतर तुम्ही वॉइस टायपिंग सुरू करू शकता.

या गोष्टी लक्षात ठेवा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वॉइस टायपिंग फीचर वापरताना तुम्ही भाषा देखील बदलू शकता. यासाठी डाव्या बाजूला लँग्वेज बारवर क्लिक करा. यातील कोणतीही भाषा तुम्ही निवडू शकता. भाषा निवडल्यानंर ओके करा. परंतु, वॉइस टायपिंग करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहेत. वॉइस टायपिंग व्यवस्थित न केल्यास नुकसान होऊ शकते. आसपास आवाज असल्यास तो टाइप होऊ शकतो. त्यामुळे, वॉइस टायपिंग केल्यानंतर सर्व मजकुरावर एकदा नजर टाका. त्याचबरोबर, काही शब्द कॅच न झाल्याने अचूकता मिळत नाही. त्यामुळे, मजकुरावर एकदा लक्ष द्यावे. चूकल्यास दुरुस्त करावे.