scorecardresearch

OnePlus 11R की OnePlus 10R: जबरदस्त प्रोसेसर, बेस्ट कॅमेरा अन् बॅटरीमध्ये कोण ठरेल बेस्ट? जाणून घ्या सर्वकाही

OnePlus कंपनी नवनवीन स्मार्टफोन्स आपल्या ग्राहकांसाठी बाजारात लॉन्च करत असते.

OnePlus 11R vs OnePlus 10R news
OnePlus 11R vs OnePlus 10R:- लोकसत्ता ग्राफिक्स टीम

OnePlus ही एक मोबाईल उत्पादक कंपनी आहे. ही कंपनी नवनवीन स्मार्टफोन्स आपल्या ग्राहकांसाठी बाजारात लॉन्च करत असते. त्याशिवाय लॅपटॉप, इअरबड्स,हेडफोन, आयपॅड अशा गॅजेट्सचे देखील उत्पादन करत असते. फ्लॅगशिप फोन OnePlus 11R आणि OnePlus 11 हे स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. OnePlus 11 हा स्मार्टफोन सॅमसंग आणि अ‍ॅपलच्या बेस्ट सेल्सर स्मार्टफोनशी स्पर्धा करतो. जर तुमचे बजेट फार कमी आणि फार जास्त नसेल तर तुम्ही OnePlus 11R स्मार्टफोन खरेदी करू शकता. आज आपण OnePlus 11R आणि OnePlus 10R मध्ये कोणता स्मार्टफोन चांगला आहे , त्याची किंमत काय आहेत , फीचर्स ते जाणून घेऊयात.

OnePlus 11R vs OnePlus 10R चे डिस्प्ले आणि डिझाईन

वनप्लसचे नेहमीचे डिझाईन OnePlus 10R मध्ये बघायला मिळते. तर OnePlus 11R हा OnePlus 11 च्या क्लोनसारखा दिसतो. OnePlus 10Rच्या कॅमेरा मोड्युलमुळे त्याचे बॅक पॅनलचे डिझाईन चांगले दिसतात. OnePlus 11R चे डिझाइन अधिक वापरकर्त्यांना आवडेल. हे दोन्ही समोरच्या बाजूने सारखेच दिसतात. नवीन OnePlus 11R मध्ये ६.७४ इंचाचा डिस्प्ले आणि OnePlus 10R मध्ये६.७ इंचाचा डिस्प्ले वापरकर्त्याना मिळतो.

हेही वाचा : Elon Musk चे पुन्हा विचित्र ट्वीट; चक्क कुत्र्याला CEO च्या खुर्चीवर बसवत म्हणाला, “हा तर..”

परफॉर्मन्स आणि बॅटरी

OnePlus 10R या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 8100 Max हा प्रोसेसर देण्यात आला आहे.त्याचवेळी OnePlus 11R मध्ये Snapdragon 8+ Gen 1 हा प्रोसेसर देण्यात आला असून , जो सुपीरियर TSMC 4nm प्रक्रियेवर आधारित आहे. दोन्ही स्मार्टफोन्सचे चिपसेट हे कागदावर भिन्न असू शकतात. मात्र हे दोन्ही स्मार्टफोन वास्तविक जगाच्या कामगिरीचा अनुभव देतात. तुम्ही कोणताही स्मार्टफोन खरेदी करा मात्र दोन्ही फोन तुम्हाला दैनंदिन वापरात चांगला अनुभव देतात. या दोन्ही स्मार्टफोनमध्ये ५००० mAh क्षमतेची बॅटरी मिळते.

कॅमेरा

OnePlus 11R मध्ये ५० मेगापिक्सलचा कॅमेरा येतो. त्यामध्ये Sony IMX890 कॅमेरा सेन्सर येतो. तसेच यामध्ये फ्लॅगशिप लेव्हल कॅमेराचा परफॉर्मन्स मिळण्याची अपेक्षा आहे. त्याशिवाय OnePlus 10R मध्ये ५० मेगापिक्सलचा कॅमेरा येतो. ज्यात कोणत्याही स्थितीमध्ये चांगले फोटोज काढण्याची क्षमता आहे. दोन्ही स्मार्टफोनमध्ये १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा वापरकर्त्यांना वापरायला मिळतो.

हेही वाचा : WhatsApp ने आणले ‘हे’ नवीन फिचर, वापरकर्त्यांना सेव्ह करता येणार गायब होणारे मेसेज

कोणता स्मार्टफोन खरेदी करावा ?

नवीन OnePlus 11R हे मागच्या OnePlus 11R चे मोठे अपग्रेड व्हर्जन आहे. OnePlus 11R मध्ये कॅमेरा, परफॉर्मन्स, सॉफ्टवेअर असो OnePlus 11R मध्ये सगळे काही चांगले आहे. जर तुम्हाला कमी वजनाचा फोन हवा असेल किंवा तुमचे बजेट कमी असेल तर तुम्ही OnePlus 10R खरेदी करू शकता. अन्यथा OnePlus 11R हा एक चांगला पर्याय आहे आणि याच्या मदतीने तुम्ही मिड-बजेटमध्ये फ्लॅगशिप फोनचा अनुभव घेऊ शकता.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-02-2023 at 16:14 IST