BSNL Offer 75GB Data Free: जर तुम्ही बीएसएनएल वापरकर्ते असाल तर तुम्हाला ७५जीबी डेटा मोफत मिळण्याचीही उत्तम संधी आहे. खरं तर, या महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच, कंपनीने स्वातंत्र्य दिनानिमित्त आपल्या वापरकर्त्यांसाठी एक उत्तम ऑफर आणली होती, ज्या अंतर्गत वापरकर्त्यांना दोन रिचार्जवर ७५जीबी डेटा मोफत दिला जात आहे. पण कंपनीची ही शानदार ऑफर केवळ ३१ ऑगस्टपर्यंत वैध असणार आहे. त्यामुळे जर तुम्ही या मोफत ७५जीबी डेटा योजनेचा लाभ घेतला नसेल, तर खाली नमूद केलेल्या प्लॅनमधून लवकरात लवकर रिचार्ज करा.
BSNL Offer
बीएसएनएल आपल्या दोन लोकप्रिय वार्षिक योजनांसह ७५जीबी डेटा ऑफर करत आहे. हे प्लॅन २३९९ आणि २९९९ रुपयांचे आहेत. या दोन्ही प्लॅनमध्ये दररोज ३ जीबीपर्यंतचा डेटा आणि अमर्यादित कॉलिंगसह अनेक फायदे दिले जात आहेत.
( हे ही वाचा: iPhone 14 Launch Date Announced: ‘या’ तारखेला लाँच होणार iPhone 14; जाणून घ्या संपूर्ण माहिती)
BSNL 2999 Rs Recharge
बीएसएनएलच्या २९९९ रुपयांच्या रिचार्जमध्ये वापरकर्त्यांना ३६५ दिवसांची वैधता मिळते. याशिवाय प्लॅनमध्ये युजर्सना दररोज ३जीबी डेटा दिला जातो. याशिवाय यूजर्सना ७५जीबी अतिरिक्त डेटा देखील मोफत मिळेल. त्यानुसार, ग्राहकांना एकूण ११७०जीबी डेटा वापरण्यासाठी दिला जाईल. त्याच वेळी, या प्लॅनमध्ये व्हॉईस कॉलिंग अमर्यादित उपलब्ध आहे. याशिवाय, रिचार्जमध्ये दररोज १००एसएमएस, PRBT आणि इरॉस नाऊचा ३० दिवस मोफत प्रवेश देखील उपलब्ध आहे.
BSNL 2399 Rs Plan
बीएसएनएलच्या २३९९ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये ३६५ दिवसांची वैधता देखील उपलब्ध आहे. त्याच वेळी, वापरकर्त्यांना प्लॅनमध्ये दररोज २जीबी डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस देखील मिळतात. इतर फायद्यांबद्दल बोलत असताना, ओटीटी चा फायदा देत, कंपनी आपल्या प्लॅनमध्ये ३० दिवसांसाठी Eros Now चे मोफत सबस्क्रिप्शन देखील देते. याशिवाय यूजर्सना रिचार्जमध्ये ७५ जीबी डेटा अतिरिक्त मिळतो. त्यानुसार, ग्राहकांना वापरण्यासाठी एकूण ८०३जीबी डेटा मिळेल. तसेच, PRBT चा लाभ प्लॅनमध्ये ३० दिवसांसाठी उपलब्ध असेल.
( हे ही वाचा: BSNL 4G Launch: तुमचे BSNL सिम 4G नेटवर्कला सपोर्ट करते की नाही? अशा प्रकारे तपासून पाहा)
75GB Data Recharge
बीएसएनएलने नुकतेच २०२२ रुपयांचे रिचार्ज सादर केले. डेटाबद्दल बोलायचे झाले तर या प्लानमध्ये दर महिन्याला ७५जीबी डेटा दिला जातो. तसंच, हा डेटा लाभ केवळ ६० दिवसांसाठी उपलब्ध आहे. याशिवाय, एकदा तुम्ही अस्तित्वात असलेला डेटा प्लॅन संपवला की, स्पीड ४० Kbps पर्यंत खाली येईल. या प्लॅनमध्ये नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉलिंग फायदे तसेच दररोज १०० एसएमएस मिळतात.