scorecardresearch

Premium

आता वेगाने व्हायरल होणार तुमचे YouTube शॉर्ट्स, कंपनीने आणले Collab सह ‘हे’ क्रिएशन टूल

Shorts या फीचरमुळे हे प्लॅटफॉर्म अधिक लोकप्रिय झाले आहे.

you tube shorts collab, q & a sticker
युट्युब शॉर्ट्स व्हिडीओ (Image Credit-Freepik)

YouTube हे गुगलच्या मालकीचे प्लॅटफॉर्म आहे. हे एक व्हिडीओ शेअरिंग प्लॅटफॉर्म आहे. यावर वापरकर्ते आपला युट्युब चॅनेल सुरु करू शकतात. तसेच अनेक प्रकारचे व्हिडीओ पाहू शकतात. अलीकडेच Shorts या फीचरमुळे हे प्लॅटफॉर्म अधिक लोकप्रिय झाले आहे. यामध्ये वापरकर्ते उभे आणि लहान कालावधीचे व्हिडीओ पोस्ट करू शकतात. हे फिचर वापकर्त्यांमध्ये कल्पनाशक्ती वाढवण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. युट्युबच्या ब्लॉग पोस्टनुसार , आता दर महिन्याला २ अब्ज पेक्षा जास्त लॉग इन वापरकर्ते ‘शॉर्ट्स’ पाहत आहेत. शॉर्ट्सचा अनुभव आणखी वाढवण्यासाठी, प्लॅटफॉर्मने अनेक नवीन फीचर्स लॉन्च केली आहेत.

Collab हे एक नवीन क्रिएशन टूल आहे जे तुम्हाला युट्युब किंवा शॉर्ट्स व्हिडीओसह एक शॉर्ट रेकॉर्ड करण्याची सुविधा देते. स्प्लिट स्क्रीन फॉरमॅट सहजपणे समाविष्ट करण्यासाठी क्रिएटर्स अनेक लेआऊट पर्यायांमधून निवडू शकतात. कोणतेही लोकप्रिय शॉर्ट्स किंवा युट्युब व्हिडीओ एका क्लिकवर रिमिक्स केले जाऊ शकते. यासाठी वापरकर्त्यांना फक्त ”रिमिक्स” आणि ”कोलॅब” वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर ते ट्रेडिंग शॉर्ट्स तयार करू शकतील. याबाबतचे वृत्त indiatvnews ने दिले आहे.

Google Pixel 8 series listed on Flipkart
VIDEO: ४ ऑक्टोबरला लॉन्च होणार गुगल Pixel 8 सिरीज; ५० मेगापिक्सलसह मिळणार…, एकदा पाहाच
Amazon Great Indian Festival sale 2023
Amazon Great Indian Festival Sale: १० ऑक्टोबरपासून सुरू होणार सेल; ‘या’ प्रॉडक्ट्सवर मिळणार आकर्षक ऑफर्स, VIDEO पाहाच
flipkart big billion days sale 2023
Flipkart Big Billion Days 2023: इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्सवर मिळणार ८० टक्के डिस्काउंट; कधीपासून सुरू होणार सेल?
reliance jio netflix basic postpaid plans
रिलायन्स जिओच्या ‘या’ रिचार्ज प्लॅन्समध्ये युजर्सना मिळणार NetFlix चे सबस्क्रिप्शन, किंमत…

हेही वाचा : Best Smartphones Under 15000: १५ हजार रूपयांमध्ये कोणकोणते स्मार्टफोन येतात माहितीये का? पाहा संपूर्ण यादी

यूट्यूबने आणखी एक रोमांचक असे फिचर आणले आहे. जे Q&A (प्रश्नोत्तर) स्टिकर असे आहे. जे क्रिएटर्सना प्रश्न विचारून आणि थेट कमेंटमध्ये प्रतिसाद मिळवून आपल्या प्रेक्षकांशी जोडले जाण्याची परवानगी देते. या इंटरऍक्टिव्ह स्टिकरचे उद्दिष्ट क्रिएटर्स आणि प्रेक्षक यांच्यामध्ये अर्थपूर्ण संबंध वाढवणे हे आहे. क्रिएटिव्ह प्रक्रिया आणखी सोपी करण्यासाठी कंपनीने अशे एक फिचर आणले आहे जे शॉर्ट रिमिक्समधून ऑडिओ आणि इफेक्टस आपोआप बंडल करते. अशाप्रकारे, क्रिएटर त्याच्या फिडवर मिळणाऱ्या प्रेरणेने सोपेपणाने नवीन कंटेंट तयार करू शकतात.

कंपनीने सांगितले, येणाऱ्या काही आठवड्यांमध्ये प्लॅटफॉर्म नवीन पुनर्रचना टूलचे टेस्टिंग सुरू करेल. या टूल्सचा उद्देश वापरकर्त्यांना त्यांचे हॉरीझॉन्टल व्हिडीओला शॉर्ट्समध्ये बदलण्यासाठी मदत करणे हे आहे. ज्यामुळे क्रिएटर्ससाठी रचनात्मक शक्यतांचा विस्तार होतो. शॉर्ट्समध्ये व्हिडिओची क्वालिटी आणि एडिटिंग खूप महत्वाचे आहे. जेव्हा तुम्ही युट्युब शॉर्ट्ससाठी एखादा चांगला विषय निवडला असेल, तर तेव्हा आता तुम्हाला तुमच्या शॉर्ट्सची क्वालिटी आणि इफेक्ट यावर लक्ष देणे आवश्यक आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Youtube collab remix q and a sticket creation tools for shorts check all updates tmb 01

First published on: 03-08-2023 at 11:20 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×