Youtube removed 17 lack videos in india : यूट्यूबने मोठी कारवाई केली आहे. आयएनएसकडून मिळेल्या माहितीनुसार, या वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत (जुलै ते सप्टेंबर) समुदाय मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याबद्दल भारतातील सुमारे १७ लाख व्हिडिओ हटवण्यात आल्याचे यूट्यूबने म्हटले आहे. नियमांचे भंग केल्याने यूट्यूबने जगातील ५६ लाख व्हिडिओ हटवले आहेत.

कम्युनिटी गाइडलाइन एन्फोर्समेंटच्या अहवालानुसार, या व्हिडिओंपैकी ९४ टक्के व्हिडिओ मशीन्सनी शोधले आहेत. यातील ३६ टक्के व्हिडिओ एक व्ह्यू मिळण्यापूर्वी आणि ३१ टक्के व्हिडिओ १ ते १० व्ह्यू मिळाल्यानंतर हटवण्यात आले आहेत.

१० व्ह्यूपेक्षा अधिक व्ह्यू मिळण्यापूर्वीच नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ६७ टक्के व्हिडिओ हटवण्यात आले आहेत. त्याचबरोबर, समुदाय मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केल्याप्रकरणी यूट्यूबने या वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत ५० लाख चॅनेल्स हटवले आहेत. ही खूप मोठी कारवाई आहे. यातील बहुतांश चॅनल्स कंपनीच्या स्पॅम धोरणांचे उल्लंघन केल्यामुळे बंद करण्यात आले आहेत. ज्यामध्ये दिशाभूल करणारे मेटाडेटा किंवा थंबनेल्स, स्कॅम, व्हिडिओ आणि कमेंट स्पॅमचा समावेश आहे, असे अहवालात संगण्यात आले आहे.

(कमाई होईल आणि कौशल्यही दिसेल; जिओच्या शॉर्ट व्हिडिओ अ‍ॅपमध्ये काय आहे खास? जाणून घ्या)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यूट्यूबने या वर्षीच्या तिसऱ्या तिमाहीत ७२८ दशलक्ष टिप्पण्या हटवल्या आहेत. त्यापैकी बहुतांश स्पॅम होते. हटवण्यात आलेले ९९ टक्क्यांहून अधिक कमेंट्स आपोआप आढळल्याचे अहवालातून सांगण्यात आले आहे. यूट्यूबवर काय चालते आणि काय नाही चालत हे ठरवण्यासाठी यूट्यूबचे काही समुदाय मार्गदर्शक तत्वे आहेत. कंपनी आपली धोरणे मशीन लर्निंग आणि मानवी समिक्षकांच्या मदतीने राबवते.