स्मार्टफोनचा सर्व प्रकारच्या गोष्टींसाठी वापर केला जातो. त्यापैकी एक मनोरंजन आहे. स्मार्टफोनच्या दृष्टिकोनातून मनोरंजनात व्हिडीओ स्ट्रीमिंग हा एक अतिशय सामान्य छंद आहे. आता व्हिडीओ स्ट्रीमिंग अॅप्सबद्दल बोलताना कदाचित पहिले नाव जे नेहमी लक्षात येईल ते यूट्यूब आहे. जगातील सर्वात लोकप्रिय व्हिडीओ स्ट्रीमिंग अॅप्सपैकी एक यूट्यूब अलीकडेच वापरकर्त्यांसाठी त्यांचा अनुभव सुधारण्यासाठी काही मनोरंजक वैशिष्ट्ये आणत आहे. जाणून घेऊयात

यूट्यूब घेऊन आला नवीन फीचर्स

यूट्यूबने अलीकडेच iOS आणि Android वापरकर्त्यांसाठी त्यांचे अॅप अपडेट केले आहे. अपडेटनंतर आता युजर्सना अॅपवरील व्हिडीओंच्या फुल स्क्रीन मोडमध्ये अनेक फीचर्स मिळत आहेत. आता पूर्ण स्क्रीनवर व्हिडीओ पाहतानाही तुम्हाला लाइक, नापसंत, टिप्पणी, प्लेलिस्टमध्ये अॅड आणि शेअर असे पर्याय दिले जातील. याचा अर्थ असा की यापैकी कोणतेही क्लिक करण्यासाठी तुम्हाला फुल स्क्रीन व्ह्यू बंद करण्याची आवश्यकता पडणार नाही.

Upcoming WhatsApp feature to tell you when someone was recently online will also show you a list of people
लास्ट सीन सोडा, आता व्हॉट्सॲप दाखवणार यादी; कोण, कधी ऑनलाइन आहे मिनिटांत कळणार
Vodafone Idea FPO, Vodafone-Idea,
विश्लेषण : अर्ज करावा की करू नये.. व्होडाफोन-आयडिया ‘एफपीओ’बाबत तज्ज्ञांचे मत काय?
Loksatta kutuhal Development and importance of computer vision
कुतूहल: संगणकीय दृष्टीचा विकास आणि महत्त्व
how to check purity of wheat flour
Kitchen Jugaad : गव्हाचे पीठ भेसळयुक्त आहे की नाही, कसे ओळखायचे? ही सोपी ट्रिक लक्षात ठेवा

व्हिडीओ शेअर करणे आता सोपे होणार

जर तुम्ही यूट्यूब वापरत असाल तर तुम्हाला व्हिडीओ कसा शेअर करता येईल हे माहित असणे आवश्यक आहे. साधारणपणे, तुम्ही जर एखादा व्हिडीओ पाहत असाल आणि त्याच वेळी तो एखाद्या मित्रासोबत शेअर करू इच्छित असाल, तर हे करण्यासाठी तुम्हाला आधी फुल स्क्रीन व्ह्यू बंद करावा लागत होता. तसेच फोन परत पोर्ट्रेट मोडमध्ये ठेवावा लागेल आणि त्यानंतर तुम्ही ऍक्सेस करू व्हिडीओ शेअर करत होता. मात्र आता हा पर्याय तुम्हाला स्क्रीनच्या अगदी तळाशी फुल स्क्रीन व्ह्यूमध्ये दिला जात आहे. ज्यामुळे व्हिडीओ शेअरिंग सोपे होणार आहे.

तुम्हालाही या अपडेटचा लाभ घ्यायचा असेल, तर लगेच गूगल प्ले स्टोअर (Google Play Store) किंवा अॅप स्टोअर (App Store) वर जाऊन तुमचे यूट्यूब अॅप अपडेट करा.