टूजी, थ्रीजीनंतर आणि फोरजी इंटरनेट जोडणी मोबाइलवर उपलब्ध झाली आहे. ही जोडणी मिळण्यासाठी सध्या बाजारात फोरजी फोन्स खरेदी करणाऱ्यांची संख्या चांगलीच वाढू लागली आहे; पण हे फोन खरेदी करत असताना त्यावर फोरजी कोणत्या क्षमतेपर्यंतचे चालेल हे तपासणे महत्त्वाचे ठरते. फोरजी जोडणी म्हणजे नेमके काय, त्याचे फायदे-तोटे हे आपण जाणून घेऊयात.

फोरजी म्हणजे काय
फोरजीची सेवा भारतात आत्ता येत असली तरी याचा शोध २००० च्या अखेरीस लागला आणि सेवा उपयोगात आणण्यास सुरुवात झाली. या सेवेत आपल्याला १०० एमबीपीएसपासून ते एक जीबीपर्यंतचा वेग मिळणे शक्य होणार आहे. थोडक्यात सांगायचे तर सध्या आपल्याला ब्रॉडब्रँडमधून जेवढा वेग मिळतो तेवढाच वेग मोबाइलमध्ये मिळू शकतो. यामुळे आपल्याला ‘मॅजिक’ उपलब्ध होणार आहे. हे मॅजिक म्हणजे जादू नव्हे. एम- मल्टिमीडिया, ए- एनीटाइम एनीव्हेअर, जी- ग्लोबल मोबॅलिटी सपोर्ट, आय- इंटीग्रेटेड वायरलेस सोल्यूशन, सी- कस्टमाइज्ड पर्सनलाइज्ड सव्र्हिसेस. या सर्व सेवांचा अनुभव सध्या काही मोबाइल ग्राहक घेत आहेत. सध्या केवळ एअरटेल ही एकमेव कंपनी फोरजी सेवा पुरवीत असून इतर कंपन्यांची सेवा लवकरच बाजारात येणार आहे.

Untitled-1

फोरजी नेटवर्क निवडताना
आपल्या फोनमध्ये टूजीचे नेटवर्क ‘ई’ या आद्याक्षराने दर्शविले जाते. थ्रीजीचे नेटवर्क ‘थ्रीजी’ आणि ‘एच’ किंवा ‘एच प्लस’ अशा सांकेतिक भाषेत दर्शविलेले असते. यातील ‘एच प्लस’ म्हणजे सर्वात चांगली थ्रीजी जोडणी मानली जाते. ही जोडणी मिळण्यासाठी नेटवर्क पुरविणाऱ्या कंपनीची जोडणी आणि आपला फोन या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. फोरजी तंत्रज्ञान म्हणजे आपल्याला चांगले बँडविड्थ उपलब्ध करून देते. यामुळे आपल्याला इंटरनेटचा अधिक जास्त वेग, उच्च दर्जाचा आवाज, व्हिडीओ कॉन्फरन्सिंग आणि कोलॅबोरेटिंग अशा इंटरनेटच्या सुविधा मिळणार आहेत. हे नेटवर्क ‘एलटीई’ (लाँग टर्म इव्होल्यूशन) असे दाखविले जाते. स्मार्टफोनवर इंटरनेट प्रोटोकॉलधारित नेटवर्क पुरविणारे फोरजी नेटवर्क हे सवरेत्कृष्ट मानले जाते. यामध्ये आपल्याला अत्याधुनिक ‘व्हीओएलटीई’ तंत्रज्ञानाचा वापर करता येतो. यामध्ये आपल्याला वाय-फाय जोडणीपेक्षाही जास्त चांगली जोडणी मिळू शकते व आपण इंटरनेट कॉल्ससारख्या गोष्टी करू शकतो. या एलटीईचा सवरेत्कृष्ट दर्जा म्हणजे ‘ईएमबीएमएस’ असतो.

व्हीओएलटीईमध्ये काय सुविधा मिळतात
’यामध्ये आपल्याला कॉलिंग सुविधा चांगली मिळते. म्हणजे एचडी व्हॉइस आपल्याला या सेवेमध्ये मिळू शकतो. हा आवाज ‘ऑडिओ सिग्नल ट्रान्समिटेड ओव्हर टेलिफोन लाइन’ या संदेशवहनाच्या प्रणालीतील उच्च दर्जाच्या सेवांपैकी एका सेवेपर्यंत पोहोचू शकतो, ज्यामुळे आवाज चांगल्या दर्जाचा येऊ शकतो.
’यामुळे आपण फोन लावल्यावर तो लागण्याचा वेळही कमी होणार आहे.
’आपण फोनवर बोलत असताना फोरजी एलटीईच्या वेगात सर्फिग करणेही शक्य होणार आहे. याचबरोबर डाऊनलोडिंग किंवा एखादे अॅप्लिकेशन वापरणेही शक्य होणार आहे.
’व्हाइस कॉल व्हिडीओ कॉलमध्ये ट्रान्स्फर होणेही अगदी सोपे होते.
’यामध्ये आपण एका वेळी सात जणांसोबत ऑडिओ कॉन्फरन्सिंग आणि चार जणांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंग अगदी सहज करू शकतो.

‘ई-एमबीएमएस’ सुविधेचे फायदे
’यामध्ये मोबाइल टीव्ही अगदी सहज पाहणे शक्य होते.
’कमी किमतीत जास्तीत जास्त फायदा मिळू शकतो.
’स्पेक्ट्रमचा वापर कमी-जास्त करण्याची सुविधा.

व्हीओवाय-फाय कॉलिंग
’वाय-फाय नेटवर्कवर वॉइस सेवा उपलब्ध होते.
’यामध्ये वाय-फाय आणि एलटीईमध्ये सिमकार्डशिवाय कॉल करणे शक्य होणार आहे.
’ग्राहकांसाठी ही सेवा खूप कमी खर्चाची ठरणार आहे.

फोरजी उपकरणे
फोरजीची ही चांगली सेवा वापरण्यासाठी फोरजी उपकरणेही चांगली असणे आवश्यक असते. यामुळे ही उपकरणे खरेदी करत असताना आपल्याला विशेष काळजी घेणे आवश्यक असते. या फोनमध्ये फोरजी एलटीई आणि व्हीओएलटीई सेवा चालते की नाही ही माहिती करून घ्या. यानंतर फोनमध्ये इंटरनेटचे विविध मोड्स स्वीकारणे शक्य आहेत का हेही तपासून घ्या. याचबरोबर फोरजीसाठी फोनची निवड करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे ती म्हणजे जास्तीत जास्त बॅटरी क्षमता असलेला फोन घ्यावा, कारण फोरजीच्या सतत वापरामुळे बॅटरी खूप लवकर संपते. फोरजीचा वापर करण्यासाठी मोबाइलव्यतिरिक्त एअरटेलने माय-फायसारखे उपकरण बाजारात आणले आहेत, ज्याचा वापर करून तुम्ही एका फोरजीच्या जोडणीवर चार ते सहा जण इंटरनेट वापरू शकतो.

फोरजीची उपलब्धता
फोरजीचा चांगलाच बोलबाला सध्या सुरू आहे. सध्या एअरटेल ही एकमेव दूरसंचार कंपनी आहे, की जी फोरजी जोडणी उपलब्ध करून देत आहे. या कंपनीची सेवा सध्या महाराष्ट्रात केवळ मुंबई, वसई, विरार, नालासोपारा, औरंगाबाद, नागपूर, पुणे, नाशिक या शहरांमध्येच उपलब्ध आहे. व्होडाफोन त्यांची फोरजी सेवा डिसेंबरअखेपर्यंत सुरू करणार आहे, तर रिलायन्स जिओची फोरजी नेटवर्क सेवाही लवकरच बाजारात येणे अपेक्षित आहे.

– नीरज पंडित
niraj.pandit@expressindia.com