05 June 2020

News Flash

नव-टेक

केजीपासून १२वीपर्यंतचा अभ्यासक्रम अॅनिमेटेड स्वरूपात शिकवणारे महाविद्या ई टॅब्लेट नुकतेच बाजारात दाखल करण्यात आले आहेत.

| June 2, 2015 06:35 am

महाविद्या ई टॅब्लेट
केजीपासून १२वीपर्यंतचा अभ्यासक्रम अॅनिमेटेड स्वरूपात शिकवणारे महाविद्या ई टॅब्लेट नुकतेच बाजारात दाखल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या प्रत्येक इयत्तेचा अभ्यासक्रम या टॅब्लेटवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यात पहिली ते दहावीपर्यंतच्या इयत्तेतील इंग्रजी, मराठी, विज्ञान, इतिहास, भूगोल, गणित हे विषय तर ११वी आणि १२वीसाठी गणित आणि विज्ञान हे विषय देण्यात आले आहेत. इंग्रजी आणि मराठी या दोन भाषांत हा अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामध्ये बहुपर्यायी प्रश्नांच्या माध्यमातून मुल्यांकन करण्याचीही सुविधा आहे. तांत्रिकदृष्टय़ा या टॅब्लेटमध्ये सात इंच आकाराची टच स्क्रीन, १.२ जीबी प्रोसेसर, अँड्रॉइड ४.२.२ ऑपरेटिंग सिस्टीम, ५१२ एमबी रॅम, चार जीबी स्टोअरेज, ३२ जीबी एक्स्टर्नल स्टोअरेज, २.३एमपी कॅमेरा अशी वैशिष्टय़े सामावली आहेत. हा टॅब्लेट ७९९९ आणि ११९९९ रुपये किमतीत उपलब्ध असून त्यावर एका वर्षांची वॉरंटी पुरवण्यात आली आहे.

सोनीचा ब्लूटुथ स्पीकर
पोर्टेबल स्पीकरना मिळणाऱ्या वाढत्या पसंतीच्या पाश्र्वभूमीवर सोनी कंपनीनेही एसआरएस-एक्स११ आणि एसआरएस-एक्स ५५ या नावाने नवीन ब्लूटुथ स्पीकर बाजारात दाखल केले आहेत. यापैकी एक्स ५५मध्ये २.१ चॅनेल व्यवस्थेने युक्त असलेले स्पीकर ब्लूटुथद्वारे लागेच कनेक्ट करता येतात. यातील स्पीकर्स ३० वॉटचे असून यामधील बॅटरी सुमारे १० तास टिकू शकेल, असा कंपनीचा दावा आहे. तर एक्स ११ हे सुमारे सहा सेंमी आकाराचे अत्यंत छोटे स्पीकर आहेत. विशेष म्हणजे, या मॉडेलमधील दोन स्पीकर्स एकमेकांना जोडून आवाज अधिक मोठा आणि श्रवणीय करता येतो. या दोन्ही मॉडेलचे स्पीकर सोनी सेंटरमध्ये विक्रीस उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

‘एलजी’चा सुपर यूएचडी टीव्ही
उच्च किंमत श्रेणीतील आणि मोठय़ा आकाराच्या टीव्ही संचांत एलजीने आता सुपर यूएचडी टीव्हीची भर पाडली आहे. कलरप्राइम, आयपीएस फोरके डिस्प्ले, वेब ओएस २.० स्मार्ट टीव्ही, मॅजिक मोशन रिमोट कंट्रोल, थ्रीडी प्लस तंत्रज्ञान आणि फोरजी एलटीई अशी आकर्षक आणि वेगवेगळय़ा टीव्हीत आढळणारी वैशिष्टय़े या एकाच टीव्हीमध्ये सामावली आहेत. यापैकी ‘कलर प्राइम’ तंत्रज्ञानामुळे टीव्हीवरील दृश्यातील प्रत्येक रंग अपेक्षित प्रमाणातच सादर होतो. तसेच यामुळे रंगछटांची संख्याही २० टक्क्यांनी वाढल्याचा एलजीचा दावा आहे. स्मार्ट टीव्हीमुळे इंटरनेटवरील यूटय़ुब तसेच लाइव्ह टीव्ही पाहणे शक्य होणार आहे. हा टीव्ही ५५, ६५ आणि ७९ इंच आकारात उपलब्ध आहे.
किंमत : २,९४,९०० रुपयांपासून पुढे.

‘फियो’चा पोर्टेबल म्युझिक प्लेअर
उच्च किंमत श्रेणीतील ‘म्युझिक प्लेअर’ बनवणाऱ्या ‘फियो’ कंपनीने भारतात ‘एक्स ३’ सेकंड जनरेशन पोर्टेबल म्युझिक प्लेअर दाखल केले आहेत. देशातील महत्त्वाच्या रिटेल शोरूम आणि ई-कॉमर्स संकेतस्थळांवरून हे म्युझिक प्लेअर लवकरच विक्रीस उपलब्ध होणार आहेत. व्हेव, फ्लॅक, एप, डब्ल्यूएमए, एएलएसी, एआएफएफ अशा नेहमीच्या ऑडिओ फॉम्र्याटसोबतच ‘डीएसडी’ या अतिउच्च डिजिटल ऑडिओ फॉम्र्याटचे संगीतही या प्लेअरवर वाजवता येऊ शकेल. तसेच यामधील विशिष्ट तंत्रज्ञानामुळे गाणी ऐकताना ऐकू येणारी खरखर किंवा तुटकपणा कमी होतो, असा कंपनीचा दावा आहे. सुमारे ९सेंमी लांब आणि ६ सेंमी रुंद आकाराचा हा पोर्टेबल प्लेअर अवघ्या १३५ ग्रॅमचा आहे. या प्लेअरवर २ इंचाची स्क्रीन पुरवण्यात आली आहे. यामध्ये २६०० एमएएच क्षमतेची बॅटरी असून ती मायक्रो यूएसबी पोर्टच्या मदतीने चार्ज करता येते. शिवाय यूएसबी चार्जर किंवा मोबाइल पॉवर बँकच्या मदतीनेही हा प्लेअर चालवता येतो. या प्लेअरमध्ये तब्बल १२८ जीबी क्षमतेपर्यंतचे मायक्रो एसडी कार्ड वापरता येते. ३.५ एमएमच्या नियमित हेडफोन जॅकसोबतच मोठय़ा स्पीकरवर वाजवण्यासाठीही स्वतंत्र प्लग पुरवण्यात आला आहे.
किंमत १४,५९९ रुपये.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2015 6:35 am

Web Title: new technology in market
टॅग Tech It
Next Stories
1 ‘विंडोज १०’ भारतीय ग्राहकांना आकर्षित करेल का ?
2 ‘विंडोज १०’ची प्रतिक्षा संपली
3 १३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा, ‘झेनफोन सेल्फी’ दाखल
Just Now!
X