‘स्वाईप टेक्नॉलॉजी’ने बालदिनाच्या पार्श्वभूमीवर भारतात पहिला ‘किड्स स्मार्टफोन’ बाजारात दाखल केला. ‘स्वाईप ज्युनिअर’ स्मार्टफोन खास बच्चेकंपनीसाठी डिझाईन करण्यात आला असून लहान मुलांना सहजगत्या हाताळता येतील असे फिचर्स या मोबाईलमध्ये देण्यात आले आहेत. पाच ते पंधरा वयोगटातील चिमुकल्या मंडळींना उपयोगी ठरतील अशा खास फिचर्सचा समावेश या फोनमध्ये करण्यात आला आहे. तसेच ‘पॅरेंट ऑपरेटेड सिस्टम’च्या सहाय्याने पालकांना देखील आपल्या पाल्याच्या स्मार्टफोन वापरावर नियंत्रण ठेवता येणार आहे. या सिस्टमच्या मदतीने पालक फोनच्या डेटा युसेज, कन्टेंट सर्च, इंटरनेट ब्राऊझिंगची मर्यादा आणि अॅप्सच्या वापरावर नियंत्रण ठेवू शकतात.

‘स्वाईप ज्युनिअर’ला ५ इंचाचा डिस्प्ले असून 3GHz चा ड्युअल-कोअर प्रोसेसर देण्यात आला आहे. मोबाईलची रॅम ५१२ इतकी मर्यादीत असली तरी फोनला ४ जीबीची इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. स्वाईफ ज्युनिअरला ३ मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा तर, २ मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा(समोरचा) आहे. तसेच हा स्मार्टफोन वायफाय, ब्लूटूथ आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटीने सुसज्ज आहे. ‘स्वाईप ज्युनिअर’ बाजारात ५,९९९ रुपयांत विकत घेता येईल.