04 August 2020

News Flash

अ‍ॅपची शाळा : नकाशावाचन

तर तुम्ही अंदाजे १०० किलोमीटरच्या अंतरात ते ठिकाण दाखवले तरच तुम्हाला गुण मिळतात.

जगाच्या नकाशावर एकूण किती देश आहेत हे तुम्हाला माहीत आहे का? जगाच्या भूगोलामध्ये खंड, देश, महासागर, पठार, पर्वत यांसारख्या अनेक गोष्टींची आपल्याला ओळख होत असते. परंतु अशा अनेक गोष्टी असतात जसे की, क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा देश, सर्वात मोठी नदी, सर्वात लांब नदी, सर्वात उंच पर्वत शिखरे याबद्दल आपल्याला जाणून घ्यायचे असते.

अशाच मनोरंजक गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवणारे अ‍ॅप म्हणजे ‘अर्बियन’चे ‘ब्रेन कॅफे/जिओ क्वीझ’ (https://play.google.com/store/apps/detailsAGid=org.urbian.android.quiz.geographyquiz
&hl=en) हे अ‍ॅप. यामध्ये कोडय़ांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या भौगोलिक माहितीची आपल्या ज्ञानात भर पडते. कोडय़ांचे एकूण ११ भाग केलेले आहेत. उदाहरणार्थ देश व त्यांचे ध्वज, राजधान्या, समुद्र, नद्या, पर्वतरांगा इत्यादी.  प्रत्येक भागात एका वेळी तुम्हाला २० प्रश्न विचारले जातात. चार पर्यायांतून योग्य उत्तर निवडायचे असते. तुम्ही निवडलेले उत्तर बरोबर किंवा चूक काहीही असले तरी बरोबर उत्तराची सविस्तर माहिती वाचायला मिळते. ही माहिती विकिपीडियावरून घेण्यात आलेली आहे.

‘सॉक्रेटिका, एलएलसी’च्या कंट्रीज ऑफ द वर्ल्ड (Countries of the world)(https://play.google.com/store/apps/detailsAGid=com.socratica.mobile.countries&hl=en ) या अ‍ॅपच्या माध्यमातून जगभरातील जवळजवळ सर्व देशांची ठळक माहिती मिळू शकते. ज्यामधे देशाची राजधानी, देशाचे क्षेत्रफळ, भाषा, लोकसंख्या, चलन, तो कोणत्या खंडातील आहे

अशा बऱ्याच गोष्टींचा समावेश केलेला आहे. येथेही कोडी उपलब्ध आहेत. तुम्हाला हवे ते कोडे तुम्ही निवडू शकता. खंड, चलन, देशाचे नाव अशा अनेक विषयाशी संबंधित कोडी तुम्हाला निवडता येईल.

भारताची राजधानी नवी दिल्ली, तसेच भारतातील राज्यांच्या राजधानीची शहरे जसे की, जयपूर, भोपाळ इत्यादींची जागा नकाशावर अंदाजे दाखवता येते. पण ती अगदी अचूक दाखवण्यासाठी नकाशाचा सखोल अभ्यास असणे आवश्यक आहे.

भूगोल, नकाशे यांची विशेष आवड असणाऱ्यांसाठी ‘जेस्क्वेअरड’च्या ‘व्हेअर इज दॅट एजी जिओग्राफ्री क्विझ’ ( Where is thatAG Geography Quiz) (https://play.google.com/store/apps/detailsAGid=com.jaysquared.games.whereishd.
releasefree&hl=en ) हे अ‍ॅप खूप चॅलेंजिंग आहे. यामध्ये देश, राजधान्या, शहरे, स्टेडियम, पर्वतशिखरे इत्यादींची अचूक जागा तुम्हाला शोधायची आहे. उदाहरणार्थ, युरोपातील ऑस्ट्रियामधील व्हिएन्ना हे शहर तुम्हाला शोधायचे आहे. तर तुम्ही अंदाजे १०० किलोमीटरच्या अंतरात ते ठिकाण दाखवले तरच तुम्हाला गुण मिळतात. यामध्ये ‘लर्निग मोड’देखील आहे. प्रत्येक गेममध्ये तुम्ही नकाशावर ठिकाण दाखवले की त्या ठिकाणाच्या संदर्भातील माहिती जाणून घेण्यासाठी विकिपीडियाचा आयकॉनदेखील दिलेला आहे.

या अ‍ॅप्समुळे भोगोलिक माहिती व नकाशे समजण्यास मदत होईल आणि त्यामुळे घरबसल्या तुम्हाला जगाच्या आणखी जवळ जाता येईल.

manaliranade84@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 6, 2016 5:22 am

Web Title: geo quiz android apps on google play
Next Stories
1 कृत्रिम बुद्धिमत्तेची बाजी
2 स्मार्टफोन विकासामध्ये छोटय़ा शहरांची आघाडी
3 अस्सं कस्सं? : अ‍ॅपल विरुद्ध अँड्रॉइड!
Just Now!
X