News Flash

लघुउद्योगांचे ‘ऑनलाइन’ अस्तित्व महत्त्वाचे

भारतात सध्या मोबाइल ब्रॉडबँड अंगिकारण्याची लाट आहे.

 

भारतात साधारण ५१ दशलक्षांहून अधिक लघुउद्योग आहेत. केपीएमजीनुसार देशाच्या जीडीपीमध्ये या क्षेत्राचा एकतृतीयांश वाटा आहे आणि सुमारे ४० टक्के रोजगार याच क्षेत्रात आहे. देशातील सूक्ष्म-आíथक वातावरणात झपाटय़ाने होणारे बदल पाहता, वस्तूंचा वाढता वावर, कमी होणारे व्याजदर, प्रत्यक्ष आणि डिजिटल माध्यमातून वाढणारा संपर्क आणि स्टार्ट अप परिसंस्थेचा सातत्याने होणारा विकास यामुळे लघू आणि मध्यम उद्योगांची संख्या आणि त्यांचा सहभाग यात लक्षणीय वाढ होणार, हे ओघाने आलेच.

भारतात सध्या मोबाइल ब्रॉडबँड अंगिकारण्याची लाट आहे. आजघडीला दररोज सुमारे १० लाख लोक त्यांच्या मोबाइलवरून इंटरनेट वापरतात. देशातील इंटरनेट लोकसंख्या ४६० दशलक्षपर्यंत (२०१६पर्यंत) पोहोचली आहे आणि यात सातत्याने वाढही होत आहे. ग्राहक आता ऑनलाइन पर्यायांना जवळ करतात. त्यामुळे या बदलत्या प्रवाहाला प्रतिसाद देण्याशिवाय व्यवसायांकडे काही पर्यायही नाही. यात फक्त ऑनलाइन अस्तित्व निर्माण करणे इतकेच नाही तर मार्केटिंग ते विक्री, पेमेंट ते ग्राहकसेवा ते ऑनलाइन जाहिराती आणि ग्राहकांना आकर्षून घेणे अशा सर्व बाबतीत ऑनलाइन बाजारपेठेत आपला व्यवसाय चालवावा लागतो.

आजच्या डिजिटल जवळ आलेल्या जगात भारत संपूर्णपणे डिजिटल होण्याच्या कडेवर उभा आहे. एसएमबीच्या व्यावसायिक परिणामांवर लक्षणीय परिणाम करण्याची क्षमता इंटरनेटमध्ये आहे. सध्याच्या वेगाने पुढे जाणाऱ्या वातावरणात एमएमबी हे उद्याचे नेतृत्व आहे. हे बदल तेच घडवणार आहेत आणि आपली ध्येये गाठण्यासाठी अतिशय कौशल्याने इंटरनेटचा वापर करणार आहेत. या पाश्र्वभूमीवर सध्या भारतात प्रचलित असलेल्या इंटरनेट ट्रेंडबद्दल लघुउद्योगांनी जाणून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.

नव्या पिढीशी जुळवून घेणे

आíथक सर्वेक्षणानुसार, २०२१ पर्यंत भारत हा जगातील सर्वाधिक तरुण देश असेल. त्यावेळी देशातील ६४ टक्के कमावता आणि सक्रिय वर्ग २० ते ३५ या वयोगटात असेल. या लक्षणीय ग्राहकसंख्येमुळे उत्पादने आणि सेवांचा वापर वाढेल आणि अधिकाधिक मोबदला मिळवण्यासाठी व्यवसायांनी काय योजना राबवायला हव्यात, हेसुद्धा यातूनच ठरेल. हा ग्राहकवर्ग डिजिटल नागरिकांचा असेल आणि ऑनलाइन बाजारपेठांच्या प्रगतीमागे हीच ग्राहकशक्ती असल्याचे याआधीच सिद्ध झाले आहे. कंपन्यांनी कशा सवलती द्याव्यात, बाजारपेठेत कसे यावे, मोबदल्यासंदर्भात कसा संवाद साधावा, विक्री कशी करावी आणि इतरांनाही प्रभावित करून मौखिक प्रसिद्धी करणे अशा अनेक बाबतीत हाच ग्राहक दिशा ठरवत आहे. येणाऱ्या काळात अनेक वर्षांसाठी हाच ग्राहक अतिशय महत्त्वाचा लोकसंख्या गट असणार आहे. त्यांच्या प्रेरणा, आकांक्षा समजून घेणे आणि त्यांना जोडून घेण्यासाठी योग्य माध्यमाचा वापर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

ऑनलाइन आणि मोबाइल

आजघडीला लघुउद्योग विविध इंटरनेट साधनांचा आणि अ‍ॅप्लिकेशन्सचा लाभ घेत त्यांच्या व्यवसायावरील पकड अधिक मजबूत करू शकतील. यातून ब्रँडचा हवा तसा अनुभव देता येईल, योग्य मार्केटिंग कँपेन चालवता येईल आणि निवडक ग्राहकांना जोडून घेता येईल.

चीननंतर भारताची लोकसंख्या सर्वाधिक आहे. ही संख्या आकर्षक आहेच. मात्र या ऑनलाइन पायातून मिळणाऱ्या क्षमतांचा पुरेपूर वापर अद्याप व्यवसायांनी केलेला नाही.

नुकत्याच झालेल्या नेल्सन सर्वेक्षणानुसार, भारतातील ५० टक्के ग्राहक खरेदीचा निर्णय पक्का करण्यापूर्वी ते उत्पादन किंवा सेवा ऑनलाइन शोधून पाहतात. लघुउद्योगांनी हे लक्षात घ्यायला हवे की त्यांचा टाग्रेट ग्राहक इंटरनेटवर आहे. त्यामुळे, प्रगती करण्यासाठी ऑनलाइन अस्तित्वाचे महत्त्व ओळखून त्याचा सन्मान राखायला हवा. वेबसाइटमुळे व्यवसायाची विश्वासार्हता वाढते, हा व्यवसाय प्रोफेशनली केला जातोय, असे चित्र निर्माण होते आणि व्यवसायाबद्दल मौखिक प्रसिद्धी करण्यात हे एक उत्तम साधन ठरते.

शिवाय, भारत हा यापूर्वीच ‘मोबाइल-फर्स्ट’ देश बनला आहे. आजघडीला जवळपास प्रत्येक नव्या इंटरनेट वापरकर्त्यांचा पहिला ऑनलाइन अनुभव मोबाइलवरच असतो.

विविध प्रकारचे वेबसाइट बििल्डग प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. ते वापरण्यास सोपे आणि परवडणाऱ्या दरात सेवा देणारेही आहेत. लघुउद्योगांनी याकडे व्यवसायवृद्धीतील महत्त्वाचा पाया म्हणून पाहायला हवे. यातून त्यांचा विस्तार वाढेल, ग्राहकनिष्ठा वाढेल, ते तुमच्याकडे टिकून राहतील आणि त्यातून व्यवसायाची कार्यक्षमताही वाढेल.

सोशल व्हा

नवीन उद्योग किंवा एसएमबीना त्यांच्या ग्राहकांशी जोडून राहण्यासाठी सोशल मीडिया हा सर्वात सोपा मार्ग आहे. सोशल मीडियामुळे लघुउद्योगांना त्यांच्या ब्रँडची ओळख वाढवण्याची संधी मिळते आणि ग्राहकांसोबत आपलाही विकास करण्यात साह्य मिळते.

क्लाऊडची सोय

क्लाऊड-बेस्ड सेवांचा वापर २०१७ मध्ये प्रचंड वाढण्याची शक्यता आहे. लघुउद्योग स्वत:चा विस्तार करत असताना त्यांच्या सातत्याने वाढणाऱ्या तांत्रिक गरजांसाठी ‘इन्फ्रास्ट्रक्चर-अ‍ॅज-अ-सर्वसि’ आणि ‘सॉफ्टवेअर-अ‍ॅज-अ-सर्वसि’ मॉडेलचे फायदे घेतीलच. त्याचबरोबर या सेवांच्या पेमेंटसाठी ऐच्छिक लवचीकताही जपली जाईल.

त्याचप्रमाणे, लघुउद्योगांमधील कामकाज अधिक चांगल्या रीतीने चालवणे आणि त्यात अचूकता जपणे, अनावश्यक वाटणाऱ्या गुंतवणुकीवर खर्च न करता किंवा उद्योगात तांत्रिक टीम बाळगण्याची गरज न भासता लघुउद्योगांना अत्याधुनिक तांत्रिक पर्याय अंगिकारणे यामुळे शक्य होणार आहे.

सहज कुठेही उपलब्ध असणे आणि उपयोजनातील सहजता यामुळे २०१७ मध्ये लघुउद्योगात क्लाऊड अंगिकारण्याची लाट मोठय़ा प्रमाणावर असेल. भारतातील एकूण एसएमबीमधील १२ दशलक्ष उद्योग ‘टेक्नॉलॉजी-रेडी’ आहेत. शिवाय, हे उद्योग डेटा लॉस प्रिव्हेंशन, सिस्टम बॅकअप्स, रिझास्टर रिकव्हरी सोल्युशन यासारखी नवी आयटी उत्पादने अंगिकारण्यावर भर देत आहेत. ही प्रक्रिया याच वेगाने पुढे जाणार आहे.

अधिक सुरक्षित

लघुउद्योग अधिकाधिक प्रमाणात ऑनलाइन जगतात आपले अस्तित्व निर्माण करत आहेत. त्यांचा डेटा आणि त्यांच्या ऑनलाइन प्रॉपर्टीचा अ‍ॅक्सेस जपणे आणि सुरक्षित ठेवणे ही एक अत्यंत महत्त्वाची गरज बनत आहे. लघु आणि मध्यम उद्योगांसाठी सुरक्षितता हा तांत्रिक आव्हानांमधील सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. चुकीच्या आणि अयोग्य बाबींना दूर ठेवण्यासाठी एसएमबीजना तज्ज्ञ वेंडर्स आणि सेवा पुरवठादारांवर अवलंबून रहावे लागेल.

अ‍ॅनालिटिक्ससह डेटाच्या ताकदींचा फायदा

आजघडीला, डेटा हे नवे चलनच आहे, असे म्हणावे लागेल. परिणामकारकरीत्या आणि योग्यरीत्या वापरल्यास त्यातून ग्राहकांचा अत्यंत मूल्यवान असा दृष्टिकोन समजू शकतो. यामुळे व्यवसायातील भविष्याकालीन आराखडय़ांसाठी मदत होते. दररोज निर्माण होणाऱ्या डेटामधून अ‍ॅनालिटिक साधनांच्या मदतीने अर्थपूर्ण आणि कार्यवाही दृष्टिकोन समजून घेण्यासाठी व्यवसायांना फायदा होऊ शकतो. स्पर्धा वाढते आहे. व्यवसायांचे योग्य नियंत्रण करण्यासाठी व्यवसायांकडून डेटाचा वापर होतो आहे. यातूनच विकास साधला जाणार आहे. या माहितीच्या महाजालात उडी घेण्याची हीच योग्य वेळ आहे!

लेखिका गोडॅडी इंडियाच्या वरिष्ठ संचालिका (विपणन) आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2017 12:58 am

Web Title: online branding important in small enterprises
Next Stories
1 दमदार आवाजाची अनुभूती
2 फोनचा ‘स्मार्ट’ वापर
3 नवउद्योगांमुळे देशाच्या इंटरनेट क्षमतेत वाढ
Just Now!
X