News Flash

टेक ‘लक्ष्य’ नवीन स्मार्टफोनधारक

जगात आजही ५५ कोटी लोकसंख्या फीचर फोन किंवा सोप्या शब्दांत सांगायचं तर साध्या मोबाइलचा वापर करते.

टायसन इकोसिस्टिमच्या झेड १ आणि झेड ३ नंतर कोरिअन कंपनी सॅमसंगचा झेड २ हा नवा मोबाइल फोन गेल्या आठवडय़ात भारतात लाँच करण्यात आला. मागील वर्षी भारतीय बाजारात दाखल झालेल्या झेड १ आणि झेड ३ या स्मार्टफोनबाबत वापरकर्त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया आणि सूचनांचा अंतर्भाव करून ‘झेड २’ची निर्मिती करण्यात आली आहे. ‘झेड २’चे सर्वात महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे हा स्मार्टफोन पहिल्यांदाच स्मार्टफोन वापरू इच्छिणाऱ्यांसाठी तयार करण्यात आलेला फोन आहे.

जगात आजही ५५ कोटी लोकसंख्या फीचर फोन किंवा सोप्या शब्दांत सांगायचं तर साध्या मोबाइलचा वापर करते. या लोकसंख्येतील एक मोठा ग्राहकवर्ग स्मार्टफोनकडे वळवण्यासाठी किमतीने स्वस्त आणि वापरण्यास सहज असलेल्या ‘झेड २’ची सॅमसंगने निर्मिती केली आहे. या फोनसोबत रिलाईन्स कंपनीचे ‘जियो’ सिम मोफत देण्यात येणार असून वापरकर्त्यांना चार महिने मोफत ४जी सेवेचा आस्वाद घेता येणार आहे.

एस बाईक मोड, मनी ट्रान्सफर यासारख्या अधिक सेवांमुळे झेड २ वापरकर्त्यांचे लक्ष वेधून घेण्याची शक्यता आहे. मात्र स्मार्टफोन वापरणाऱ्यांना आणि मुख्यत: चांगला कॅमेरा त्यातही सेल्फी काढणाऱ्यांना हा फोन निराश करेल. या मोबाइलला ५ मेगा पिक्सल आणि एलईडी फ्लॅश असला तरी सेल्फी काढण्यासाठी पुढील फ्लॅश देण्यात आलेला नाही. त्यामुळे साधा फोन वापरण्याचा कंटाळा आलेल्यांना आणि नव्याने स्मार्टफोन वापरण्याची इच्छा असणाऱ्यांपुरताच हा स्मार्टफोन ‘स्मार्ट’ ठरू शकेल.

झेड २ची वैशिष्टय़े

  • चार इंची डिस्प्ले
  • पाच मेगापिक्सेल कॅमेरा(एलईडी फ्लॅशसह)
  • कॅमेऱ्यात विविध फोटो ‘मोड’ची माहिती देण्यात आली आहे.
  • ब्लुटुथ, वायफाय, जीपीएस सुविधा.
  • एक जीबी रॅम आणि आठ जीबी इंटर्नल मेमरी.
  • १२८ जीबीपर्यंत मेमरी वाढवण्याची सुविधा.
  • बॅटरीक्षमता १५०० एमएएच
  • फेसबुक, हॉटस्टॉर, डेलीहंट हे ‘डिफॉल्ट’ अॅप.
  • १२ स्थानिक भाषांची सुविधा.
  • किंमत ४५९० रुपये.

मोबाइलचा फर्स्ट लूक

झेड २ मोबाइल फोन काळ्या, सोनेरी आणि तपकिरी रंगांमध्ये उपलब्ध आहे. सध्या जरी सोनेरी रंगाच्या फोनची चलती असली तरी यातील तपकिरी रंगाचा फोन वेगळा लूक देतो. उजव्या बाजूला पॉवर बटन आणि डाव्या बाजूला आवाजाची बटणे आहेत. हातातून फोन निसटू नये यासाठी फोनच्या मागील पॅनलची रचना बदलण्यात आली आहे. तर वजनाने हलका असणारा हा फोन हातामध्ये सहज पकडता येतो.

बँकिंग सेवा देणारे अॅप

बॅकिंग सेवा पुरविणारे  स्वतंत्र अॅप झेड २ फोनचे आकर्षण ठरले आहे. मोबाइलच्या साहाय्यानेच बँकिंग व्यवहार करता येणार आहे. त्याबरोबरच मोबाइलमध्ये बँिंकग व्यवहाराचे मिनी स्टेटमेंट साठवून ठेवता येणार आहे. त्याशिवाय बँकेच्या खात्यातील रक्कमही तपासता येणार आहे. ही सर्व प्रक्रिया इंटरनेटशिवाय करता येते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2016 6:04 am

Web Title: samsung z2 mobile
Next Stories
1 अ‍ॅपची शाळा : शब्दभांडारांचे अ‍ॅप्स
2 शिओमीचा हा फोन झाला २०००ने स्वस्त
3 सरकारी ‘अ‍ॅप’लेपणा
Just Now!
X