11 July 2020

News Flash

टेक-नॉलेज : मोबाइलवर ट्रेन ड्रायव्हिंगचा गेम हवा आहे

ट्रेन ड्रायव्हिंग गेमचे संगणक मॉडेल खूप गाजले होते.

प्रतिनिधिक छायाचित्र

माझ्याकडे अँड्रॉइड मोबाइल आहे. त्यावर मला ट्रेन ड्रायव्हिंगचा गेम हवा आहे. असा कोणता गेम आहे का?

संजय पार्टे

उत्तर : ट्रेन ड्रायव्हिंग गेमचे संगणक मॉडेल खूप गाजले होते. त्याआधारे आता मोबाइल मॉडेलही काढण्यात आले आहे. गुगल प्लेवर ट्रेन्झ ड्रायव्हर नावाचा गेम उपलब्ध आहे. ट्रेन ड्रायव्हिंगचा हा एकमेव गेम प्ले स्टोअरवर सध्या उपलब्ध असून त्यासाठी तुम्हाला १५४ रुपये मोजावे लागतील. यामध्ये तुम्ही तुमची आवडती गाडी चालवू शकता. यात थ्रीडी इफेक्ट दिल्यामुळे गेम खेळत असताना एक वेगळाच अनुभव मिळतो.

मी तीन वेळा पासवर्ड बदलला तरी माझे खाते हॅक झाले. तर पासवर्डची काळजी कशी घेता येईल?

मीनाक्षी जयेश, अमरावती

उत्तर : आजमितीस जगातील २१ टक्के इंटरनेट वापरकर्ते दहा वर्षांपासून एकच पासवर्ड वापरत आहेत, तर ४७ टक्के वापरकत्रे पाच वर्षांपासून एकच पासवर्ड वापरत आहेत. २०१४ मध्ये बहुतांश लोकांचा पासवर्ड हे १२३४५६ पासवर्ड असे सोपे होते. यामुळे हॅकिंग प्रकार या काळात जास्त वाढले होते. तर बहुतांश लोक विविध ऑनलाइन लॉगइनसाठी एकच पासवर्ड वापरतात. यामुळे अनेकदा एक खाते हॅक झाले की त्या व्यक्तीची इतर खाती हॅक करणेही सोपी जातात. यामुळे प्रत्येक खात्याचा पासवर्ड हा वेगळा असणे केव्हाही उपयुक्त ठरते. याचबरोबर पासवर्ड ठेवताना जुना आधी दिलेल्या पासवर्डचा वापर करूच नये.

तसेच आपल्या नावातील आद्याक्षरे किवा जन्मतारखेचा उल्लेख त्यात नसावा. सध्या हॅकर्स हे लांबलचक पासवर्डही सहजगत्या हॅक करू लागले आहेत. यामुळे याबाबत अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. या हल्लांना ते डिक्शनरी अटॅक्स असे म्हणतात. ही प्रक्रिया अवघ्या काही सेकंदांत केली जाते. याचबरोबर की लाँगर अटॅक केला जातो ज्यात आपल्या उपकरणामध्ये मालवेअर जातो. असे झाल्यावर वापरकर्त्यांच्या नकळत पासवर्ड हॅकपर्यंत जातो. यासाठी तुम्ही पासवर्ड व्यवस्थापन प्रणालीचा वापर करून विविध खात्यांसाठी विविध पासवर्डचे व्यवस्थापन करू शकता. सध्या गुगलने क्रोम या ब्राऊझरमध्ये ऑटोफिलचा पर्याय आणला आहे. हा पर्याय अँटिव्हायरसने सुरक्षित उपकरणामध्ये वापरू शकतो. यामुळे मोठे पासवर्ड लक्षात ठेवण्याची गरज पडत नाही. तज्ज्ञांच्या मतानुसार पासवर्ड म्हणून मोठय़ा म्हणी किंवा वाक्प्रचारांचा वापर करणे केव्हाही योग्य ठरते.

या सदरात प्रश्न पाठविण्यासाठी lstechit@gmail.com वर लॉगइन करा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2017 12:39 am

Web Title: train driving game loksatta tech knowledge
Next Stories
1 ‘डबललॉकर’चे संकट
2 ‘आयओटी’चा प्रभाव
3 टेक-नॉलेज : सार्वजनिक वाय-फाय वापरताना?
Just Now!
X