प्रत्येक स्मार्टफोनमध्ये वरून दिसतं, त्याहीपेक्षा बरंच काही दडलेलं असतं. ही गुपितं कोणी तंत्रज्ञच शोधून काढू शकतो. तर काही गुपिते छुप्या संकेतांकानिशी उघड होत असतात. अँड्रॉइडच्या स्मार्टफोनशी संबंधित अशी अनेक गुपितं आता उघड झाली आहेत. मात्र आयफोनबद्दल क्वचितच अशी गुपिते माहीत असतात. आयफोनमध्येही अनेक सांकेतिक कोड वापरून ही गुपिते उघड करता येऊ शकतात. अशाच काही सांकेतिक शब्दांच्या आणि त्यांच्या वापराच्या टिप्स :
१. आयफोनमधील तांत्रिक अडचणी शोधून काढण्यासाठी तुम्ही ‘स्पेशल डायग्नोस्टिक’ची मदत घेऊ शकता. या डायग्नोस्टिकच्या माध्यमातून ‘सिग्नलची मर्यादा जाणून घेता येते. त्यासाठी आयफोनचे फोन अॅप उघडून त्यावरून ‘*3001#12345#*’ हा क्रमांक डायल केल्यास तुम्हाला अनेक तांत्रिक गोष्टींचा मेन्यू समोर दिसतो.
२. आयफोनच्या सिग्नलची क्षमता तपासायची असल्यास, या मेन्यूमधील ‘फिल्ड टेस्ट मोड’मध्ये जाऊन ‘पॉवर’ बटन दाबून धरा. त्या ठिकाणी तुम्हाला ‘स्लायडर’ दिसून येईल. त्यानंतर ‘होम’चे बटण दाबून धरल्यास तुम्हाला काही अंक दिसून येतील. हे अंक तुमच्या फोनची ‘सिग्नल क्षमता’ दाखवून देतात. -४० ते -८० दरम्यानचा आकडा म्हणजे फोनचे नेटवर्क अतिशय उत्तम आहे. मात्र, -११०च्या पुढे असलेला आकडा म्हणजे नेटवर्क कमकुवत आहे, असे समजा. आपण परदेशात किंवा दुर्गम भागात असताना ‘कॉल ड्रॉप’ टाळण्यासाठी त्या ठिकाणी असलेली ‘सिग्नलची क्षमता’ तपासून पाहता येते.
३. ‘. *#06#’ या कोडनिशी तुम्हाला आयफोनचा ‘आयएमईआय’ क्रमांक पाहता येतो.
४. ‘*#33# ’ या कोडद्वारे तुमच्या फोनमधील एसएमएस, व्हॉइस कॉलिंग आणि डेटा सक्रिय आहे का, हे तपासता येते.
५. ‘*#*#4636#*#* ’ हा कोड दाबल्यास तुमच्यासमोर फोनची संपूर्ण माहिती येते.