News Flash

पावसामुळे समोरुन येणारा टँकर न दिसल्याने दुचाकीचा अपघात, तरुणीचा मृत्यू

लोकमान्यनगर येथे राहणारी प्रियांका झेंडे ही तरुणी शनिवारी पावसाची मजा घेण्यासाठी मैत्रिणीसोबत दुचाकीवरुन घोडबंदर रोड येथे गेली होती.

प्रतिनिधिक छायाचित्र

ठाण्यातील घोडबंदर रोड येथे मुसळधार पावसामुळे विरुद्ध दिशेने येणारे टँकर न दिसल्याने दुचाकीस्वार तरुणीने टँकरला धडक दिल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. या घटनेत तरुणीचा मृत्यू झाला असून प्रियांका झेंडे (वय २२) असे या तरुणीचे नाव आहे.

लोकमान्यनगर येथे राहणारी प्रियांका झेंडे ही तरुणी शनिवारी पावसाची मजा घेण्यासाठी मैत्रिणीसोबत दुचाकीवरुन घोडबंदर रोड येथे गेली होती. तिथून परतत असताना नागला चौकी परिसरात प्रियांकाला पावसामुळे विरुद्ध दिशेने येणाऱ्या टँकरचा अंदाज आला नाही आणि ती थेट टँकर खाली सापडली. प्रियांकाच्या डोक्यावरुन टँकरचा चाक गेल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. प्रियांकाने हेल्मेट घातले नव्हते, अशी माहिती आता समोर येत आहे. पावसात वाहनचालकांनी सावध राहावे आणि दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Mumbai monsoon updates: मुंबई का तुंबली?, महापालिकेने दिले उत्तर

Photos : मुंबापुरीची झाली तुंबापुरी!

दरम्यान, मुंबई, ठाणे आणि राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनचे आगमन झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली. शनिवारी सकाळपासून मुंबई आणि उपनगराला मुसळधार पावसाने झोडपले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2018 5:56 pm

Web Title: 22 year old girl died in accident during heavy rain on ghodbunder road
Next Stories
1 Maharashtra SSC 10th result 2018 : ठाणे जिल्ह्याचा निकाल ९० टक्के
2 ठाण्यात पावसाळापूर्व वृक्षछाटणी सदोष?
3 अग्निशमन दलाकडे निकृष्ट यंत्रणा
Just Now!
X