देवीचा जागर, गरब्याचा जल्लोष, नव्या कपडय़ांची सळसळ, तऱ्हेतऱ्हेचे दागिने, टिपऱ्यांचे हजारो प्रकार आणि तऱ्हतऱ्हेच्या फु लांनी घमघमलेला बाजार.. असं काहीसं नवरात्रीचं दरवषीचं चित्र. यंदा मात्र करोनामुळे हे चित्र बदललं. यंदा सगळे सण मुखपट्टय़ा आणि सॅनिटायझरच्या साथीनेच साजरे होणार असे दिसत आहे. अर्थात हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे.  काही ठरावीक वेळा पाळून बाजार उघडले जात आहेत. त्यामुळेच नेहमीइतका नसला तरी सणांचा उत्साहही वातावरणात जाणवतो आहे.

Shukra Gochar 2024
Shukra Gochar 2024 : पौर्णिमेच्या दिवशी शुक्र गोचर पालटणार नशीब, ‘या’ राशींच्या लोकांना मिळणार बक्कळ पैसा
Shukra Gochar 2024
हनुमान जयंतीनंतर या ६ राशींचे नशीब चमकणार! मेष राशीमध्ये होणार शुक्राचे गोचर, नोकरदारांचे चांगले दिवस येणार
Saint Balumamas Rathotsav ceremony ended today with excitement
कोल्हापूर : भंडाऱ्याच्या मुक्त उधळणीत संत बाळुमामांचा रथोत्सव उत्साहात
in nashik ramnvami related garud rath miravnuk preparation
नाशिक : गरुड रथ मिरवणुकीची तयारी अंतिम टप्प्यात

नवरात्रीचा सण म्हणजे  स्त्रीशक्तीचा जागर. देवीच्या रूपाला वंदन करताना आपल्या आजूबाजूच्या स्त्रियांचाही आदर करण्याची शिकवण हा सण देतो. अनेक घरांमध्ये घटस्थापना करून नवरात्र बसवले जाते. देवीची पूजेतील मूर्ती किं वा देवीचा टाक याची पूजा के ली जाते. एका घडय़ामध्ये माती ठेवून त्यात धान्याची पेरणी के ली जाते. या घटाला दररोज एक याप्रमाणे नऊ दिवस, फु लांच्या नऊ माळांनी आरास केली जाते. देवीच्या या नवरात्रात काही ठिकाणी पापडय़ा म्हणजे कुरकुरीत पुऱ्यांची माळ टांगली जाते तर काही ठिकाणी ऊस आणि इतर फळे-फुले बांधून आरास होते. अर्थात निरनिराळ्या प्रदेशांप्रमाणे या पद्धतींमध्येही काही बदल होतात. पण साजरे करण्याची, आनंद वाटण्याची भावना मात्र साऱ्यांची एकच असते.

सण-समारंभ म्हटले की नटूनथटून मिरवणे आले, त्यासाठी तऱ्हतऱ्हेचे दागदागिने, साडय़ा, कपडे यांची खरेदी आलीच. पण यंदा बाहेर जायचे नसल्याने नवी खरेदीही अर्थातच कमी झाली आहे. पण आपण सारेच उत्सवप्रिय आहोत. त्यामुळे प्रत्यक्ष भेटता आले नाही तरी ई-भेटीचे पर्याय आपण शोधले आहेत. निरनिराळ्या समाजमाध्यमांतून संवाद करत, व्हिडीओ कॉल्स, कॉन्फरन्स करत एकमेकांना भेटणे शक्य झाले आहे. सणाच्या निमित्ताने तर या ऑनलाइन भेटीगाठींना बहर येतो. त्यामुळे ऑनलाइन मीटिंगमध्ये कोणते दागिने घालावेत, कशा प्रकारचा मेकअप करावा, यावरील टिप्स समाजमाध्यमांत शेअर होत आहेत. दागिने हा साऱ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय. पूर्वी केवळ बायकांचा विषय म्हणून दागिन्यांकडे पाहिले जात असे. पण आता पुरुषांसाठी, मुलांसाठीही उत्तमोत्तम प्रकारचे दागिने मिळतात. तऱ्हतऱ्हेच्या अंगठय़ा, ब्रेसलेट्स, चेन याचे सुंदर डिझाइन मिळतात. मुलींसाठी तर कायमच अनेक पर्याय होते. यंदा प्रत्यक्ष दुकानात जाऊन खरेदी करणे हे कमी झालेले दिसत आहे, त्याऐवजी ऑनलाइन वस्तू मागवणे वाढलेले दिसते आहे. बंगलोरला राहणारी सुखदा म्हणते, माझे सगळे नातेवाईक महाराष्ट्रात आहेत. सध्या या कोविडकाळात तर कुठे जाणे-येणेही शक्य नाही. अशा वेळी आम्ही मुद्दाम व्हिडीओ कॉल्स करतो. त्यासाठी छान तयार होऊन बसतो. त्यामुळे थोडा उत्साह वाटतो. आता हळहळू सगळीकडे निर्बंध उठवले जात आहेत. त्यामुळे बाहेर जाऊन थोडीफार खरेदी करता येते. पण पूर्वीसारखी नाहीच. यंदा दागिने, कपडे अशी सगळी खरेदीची हौस मी ऑनलाइन खरेदी करत भागवली आहे. एखाद्या आवडत्या संके तस्थळाची, त्यावरील विशिष्ट कलेक्शनची लिंक एकमेकांशी शेअर करतो. ऑनलाइन साधनांमुळे निदान सणांचे थोडे तरी सेलिब्रेशन करता येत आहे.

टाळेबंदीमुळे गावी गेलेला प्रतीक म्हणतो, बरेच दिवसांनी नवरात्रीनिमित्त गावात आहे. नेहमी कामामुळे या काळात गावी जाणे होत नाही, पण यंदा मात्र सारेच बदलले. यंदा करोनामुळे गावी असल्याने इथूनच काम सुरू आहे. येथेसुद्धा देवीचा सण मोठय़ा प्रमाणात साजरा होतो. यंदा अर्थातच इथेही काही बंधने असतील. पण यानिमित्ताने यंदा मी गावचा निसर्ग अनुभवतो आहे. पावसाळा संपत आलेला असताना वातावरणात होणारे बदल, रानफु ले, गवताची सळसळ या सगळ्या गोष्टी इतर वेळी अनुभवल्या जात नाहीत. पण यंदा मात्र देवीची रूपे आठवताना मी निसर्गाचीही ही बदलती रूपे डोळे भरून पाहणार आहे.

प्रत्येक सण आपण साजरा करतो कारण त्यातून सुंदर आठवणी मिळतात. ज्या कायम आपल्यासोबत राहतात, मनाला आनंद देतात. यंदा करोनाने मात्र सारे सण आठवणीतच साजरे करण्याची वेळ आणली. यंदा या आठवणीच कठीण काळात आपल्याला सणाचा खरा आनंद देतील. कलाकारांनीही नवरात्रीच्या सणाच्या त्यांच्या आठवणी शेअर केल्या आहेत..

कर्जतचे देवीदर्शन

जुई गडकरी, अभिनेत्री

कर्जतला आमचं मोठ्ठं एकत्र कु टुंब आहे.  प्रत्येक सण-उत्सवात आम्ही सारे गडकरी एकत्र येऊन धम्माल करतो. नवरात्रात आम्हा महिलावर्गाचा एक विशेष उपक्रम असतो. तो म्हणजे कर्जत आणि आसपासच्या परिसरातील देवीदर्शन. घरातील समस्त महिलावर्ग  छान तयार होऊन देवीदर्शनाला बाहेर पडतो. काल्र्याची एकविरा देवी ही आमच्या कु ळाची देवी असल्याने दरवर्षी तिथे जाऊन पूजा-दर्शन यानिमित्ताने एक छान कौटुंबिक सहल होते. यंदा करोनामुळे मी हे सगळं मिस करणार आहे.

कच्छचा गरबा

अमित भानुशाली, अभिनेता

माझ्या घरी दरवर्षी नवरात्रात नऊ दिवस देवीची स्थापना होते. दररोज पूजा-आरती अशी साधना होते. त्यानिमित्ताने सारे कु टुंबीय एकत्र जमतात, पाहुणे येतात. धम्माल असते. यंदा देवी तर घरी येईलच, पण पाहुणेमंडळी नसणार. मी गुजराथी घरात वाढलेलो असल्याने आमच्यासाठी गरबा म्हणजे जीव की प्राण. डोंबिवलीतल्या आमच्या घरासमोर मोठा गरबा असायचा, तिथे नृत्याच्या स्पर्धाही असायच्या. मी अकरावी-बारावीत असताना एकदा या स्पर्धेत भाग घेतला होता. खूप मस्त गरबा खेळत होतो आणि अचानक शेवटची फेरी सुरू व्हायच्या आधीच मी तिथून पळ काढला. कारण माझ्या खास गरब्याच्या ड्रेसने मला दगा दिला होता. खेळता खेळता हा ड्रेस सैल होतोय असे मला वाटत होतेच शेवटी मी नीट चाचपून पाहिले आणि गरबा सोडून तिथून पळ काढला. ही आठवण  काढून आम्ही सारे अजून हसतो. पण मला विशेष लक्षात आहे तो, कच्छचा गरबा. कच्छला आमच्या गावी पारंपरिक गरबा असतो. रात्रभर चालणाऱ्या या गरब्यात डीजे, लाइट्स, झगमगाट असे काही नसते. साध्या ढोलाच्या आणि पारंपरिक वाद्यांच्या साथीने हा गरबा रंगतो. पण तोच मला जास्त आवडतो.