24 January 2021

News Flash

मोठी बातमी! ठाण्यात लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय

ठाण्यात १९ जुलैपर्यंत लॉकडाउन कायम

संग्रहित (एक्स्प्रेस फोटो - निर्मल हरिंद्रन)

करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती अद्यापही नियंत्रणात न आल्याने ठाण्यात लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील लॉकडाउनमध्ये १९ जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिकेकडून यासंबंधी अधिकृत आदेशही प्रसिद्ध करण्यात आला आहे. याआधी करोनाची गंभीर परिस्थिती लक्षात घेता २ जुलैपासून ठाणे महापालिका क्षेत्रात लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता. १२ जुलै रोजी हा लॉकडाउन संपणार होता. पण आता लॉकडाउनची मुदत वाढवली असून १९ जुलैपर्यंत कायम राहणार आहे.

आदेशात सांगण्यात आलं आहे की, ठाणे महानगरपालिका आयुक्तांनी करोनाचा प्रसार थांबवण्यासाठी २ जुलै ते १२ जुलैपर्यंत लॉकडाउन जाहीर केला होता. आणखी काही कालावधीसाठी लॉकडाउन वाढवणं गरजेचं आहे अशी महापालिका आयुक्तांची खात्री झाली आहे. त्यामळे १२ जुलैपासून सकाळी ७ वाजल्यापासून ते १९ जुलै सायंकाळी पाच वाजेपर्यंत लॉकडाउन जाहीर करत आहोत.

 

लॉकडाउनच्या या काळात केवळ घरकाम करणाऱ्या व्यक्तींना कामावर जाण्याची मुभा असेल. या व्यतिरिक्त बाकीच्या अटी आणि नियम पूर्वीप्रमाणेच लागू राहतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2020 4:44 pm

Web Title: coronavirus lockdown extended in thane sgy 87
Next Stories
1 ठाण्यात करोना नियंत्रणाचा सावळागोंधळ
2 कळवा रुग्णालय करोनाच्या विळख्यात
3 मृतदेह अदलाबदलीप्रकरणी महापालिका आयुक्तांची दिलगिरी
Just Now!
X