News Flash

‘लोकसत्ता’च्या माध्यमातून घराची स्वप्नपूर्ती

‘घर ही माणसाच्या आयुष्यातील मूलभूत गरज असून घरासाठी आयुष्यभराची मेहनत करावी लागते. त्यानंतरच घराचे स्वप्न साकार होत असते.

| February 24, 2015 12:58 pm

‘घर ही माणसाच्या आयुष्यातील मूलभूत गरज असून घरासाठी आयुष्यभराची मेहनत करावी लागते. त्यानंतरच घराचे स्वप्न साकार होत असते. पण ‘लोकसत्ता’च्या माध्यमातून माझे घराचे स्वप्न पूर्ण झालेच; शिवाय घरावर घरही मोफत मिळाले. हा या काळातील चमत्कारच म्हणावा लागेल,’ अशा शब्दांत ‘लोकसत्ता वास्तुरंग’ वास्तुलाभ या उपक्रमाचे विजेते अंबरनाथचे प्रवीण पाठारे यांनी आपला आनंद व्यक्त केला.
गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये नवे घर खरेदी करणाऱ्या वाचकांसाठी ‘लोकसत्ता’ने तुलसी इस्टेट, केसरी टूर्स आणि जे. के. एन्टरप्रायझेस यांच्या प्रायोजकत्वाखाली ‘लोकसत्ता वास्तुरंग वास्तुलाभ’ उपक्रमाचे आयोजन केले होते. या काळात घर खरेदी करणाऱ्यांना ‘लोकसत्ता’च्या वतीने एक अर्ज उपलब्ध करून देण्यात आला होता. त्यातून निवडण्यात आलेल्या भाग्यवान विजेत्यांना या उपक्रमातून पारितोषिके देण्यात आली. पारितोषिक वितरणाचा रंगतदार कार्यक्रम ठाण्यातील टीपटॉप प्लाझाच्या डायमंड सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता. या वेळी तुलसी इस्टेटचे भावीन पटेल, किंजल पटेल, केसरी टूर्सच्या संगीता पाटील, जे. के. एन्टरप्रायझेसचे राज नायर आणि ठाण्यातील विकासक उपस्थित होते. भावीन पटेल आणि किंजल पटेल यांच्या हस्ते प्रवीण पाठारे यांना घराच्या चाव्या प्रदान करण्यात आल्या. या उपक्रमातील दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस ‘केसरी टूर्स’कडून मिळणारी सिंगापूर, थायलंड आणि मलेशिया सहल ललित कुमार ढेकळे यांना मिळाली. केसरीच्या संगीता पाटील यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.  अन्य पारितोषिक विजेत्यांपैकी नीलेश साळवी यांना एचडी एलईडी टीव्ही, सीमा पाटील आणि महादेव बहुलेकर यांना डबलडोअर रेफ्रिजरेटर, तर प्रफुल्लदत्त भांगले आणि नंदा काकडे यांना ए.सी. पारितोषिक म्हणून प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तरा मोने यांनी केले.     

घर मिळाले यावर अजूनही विश्वास बसत नाही. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी अर्ज भरला तेव्हा पारितोषिक मिळेल असे अजिबात वाटले नव्हते. आताही घर बक्षीस मिळालेय यावर विश्वासच बसत नाही. अंबरनाथमधील सरकारी कर्मचारी असून लग्न झाल्यानंतर नव्या घराच्या शोधात होतो. त्यामुळे नवे घर घेतले. त्या वेळी विकासकाने आवर्जून या उपक्रमाची माहिती दिली आणि अर्ज भरण्यासाठी मदतही केली. लग्नाच्या अवघ्या काही दिवसांमध्ये दोन घरे मिळाली. त्यामुळे खरेच भाग्यवान असल्यासारखे वाटते.
प्रवीण पाठारे, घर विजेते.

‘लोकसत्ता’च्या या उपक्रमात सहभागी झालो, त्या वेळी दुसऱ्या क्रमांकापर्यंत पोहोचू असे वाटलेही नव्हते. मात्र आज या स्पर्धेच्या अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आमची उत्सुकता कायम होती. केसरीकडून सिंगापूर, थायलंड आणि मलेशिया टूरचे बक्षीस मिळाले आहे. त्यामुळे अर्थातच खूप आनंद झाला. ‘लोकसत्ता’च्या या उपक्रमाचे मन:पूर्वक आभार.
– ललितकुमार ढेकळे, केसरी टूर्सची सिंगापूर, थायलंड आणि मलेशिया टूर पारितोषिक विजेते.

केसरी आणि लोकसत्ता एकमेकांसोबत प्रवास करणारे दोन घटक आहेत. ‘केसरी’ला महाराष्ट्रातील घराघरामध्ये पोहोचवण्यात ‘लोकसत्ता’चा मोठा वाटा आहे.  ‘लोकसत्ता’ने प्रत्येक उपक्रमामध्ये सगळ्या वयोगटातील घटकांना केंद्रस्थानी मानले आहे.
संगीता पाटील, केसरी टूर्स

वास्तुलाभ हा खूपच चांगला उपक्रम असून ‘लोकसत्ता’च्या भावी उपक्रमांमध्ये आम्ही त्यांच्यासोबत राहणार आहोत.
राज नायर, जे. के. एंटरप्रायजेस

‘लोकसत्ता’च्या या उपक्रमात पुढच्या वर्षीही आमचा सक्रिय सहभाग असणार आहे. नेरळमध्ये शुभारंभ झालेल्या प्रकल्पामध्ये या विजेत्या दाम्पत्याला घर मिळणार आहे.
-भावीन पटेल आणि किंजल पटेल, तुलसी इस्टेट

विजेते
प्रवीण पाठारे – तुलसी इस्टेटमध्ये घर
ललित कुमार ढेकळे – केसरी टूर्सची सिंगापूर, थायलंड आणि मलेशिया टूर.
नीलेश साळवी – जे. के. इलेक्ट्रिक्सकडून एलईडी टीव्ही
सीमा पाटील आणि महादेव बहुलेकर यांना  जे. के. इलेक्ट्रिक्सकडून डबल डोअर फ्रिज
नंदा काकडे आणि प्रफुल्लदत्त भांगले यांना जे. के. इलेक्ट्रिक्सकडून ए.सी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2015 12:58 pm

Web Title: dreams of the house fulfilled through loksatta says praveen pathare
Next Stories
1 पाणीटंचाईवरून नगरसेवक संतप्त
2 ठाणे शहरबात : करून दाखविले..
3 आठवडय़ाची मुलाखत : जीवनावश्यक वस्तूंचे नावीन्यपूर्ण पंचसूत्र
Just Now!
X