वसई-विरारमध्ये वीज-पिण्याचे पाणी बंद

मुसळधार पावसामुळे वसई शहर जलमय झाले होते. मात्र हे पाणी अद्याप ओसरलेले नाही. त्यामुळे शहरात रोगराईचा धोका निर्माण झाला आहे. पावसामुळे शहर चौथ्यांदा पाण्याखाली गेल्यानंतर वसई-विरारकरांच्या नशिबी अटळ हाल आले.

बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे वसई-विरार शहराचा पुराचा वेढा पडला होता. पावसाने सर्वच यंत्रणा निकामी केल्या होत्या. शहराती प्रमुख रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूकही ठप्प झाली होती. शहरतील, तसेच गावातील अनेक भागांचा संपर्क तुटला होता. १२ तासांहून अधिक काळ वीज नव्हती. अनेकांच्या घरात सोसायटीत, दुकानात पाणी शिरले होते. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले. बुधवारी दुपारनंतर पावसाने उसंत घेतल्याने नागरिकांना दिलासा मिळण्याची आशा वाटत होती. मात्र २४ तास उलटले तरी शहरातील अनेक भाग अद्याप पाण्याखाली आहेत. तेथील वाहतूक ठप्प झाली.

वसई विरार महापालिकेने जुलै महिन्यात झालेल्या पूरस्तिथी नंतर पाणी साचणार नाही असा दावा केला होता. पण पालिकेचे सारेच दावे फोल ठरले आहे. साचलेल्या भागातील पाणी काढण्यासाठी पालिकेकडे कोणतही यंत्रणा नाही. यामुळे या साचलेल्या पाण्यामुळे रोगराई पसरण्याची भीती नागरिकांना वाटत आहे.

हे पाणी काढून खाडीच्या पात्रात व नाल्यात सोडण्यासाठी पालिकेने उपसा पंप लावले आहेत. या पंपाद्वारे पाणी हे नाल्यात सोडण्याचे काम सुरु करण्यात आले होते. पंरतु लावण्यात आलेले पंप हे बंद असल्याचे दिसून आले आहे. पंप चालविण्यासाठी इंधन उपलब्ध नसल्याने हे पंप बंद ठेवण्यात आले असल्याचे समोर आले. पालिकेने नालासोपारा पूर्व , वसई पूर्व, पश्चिम याभागात पंप लावले आहेत ते पंप बंदच आहेत. पालिकेने मात्र पंप बंद पडले नसल्याचे सांगितले. आम्ही पंप चालू करून पाण्याचा निचरा युध्दपातळीवर करत आहोत असे पालिकेचे शहर अभियंता माधव जवादे यांनी सांगितले.

पाण्यामुळे नाकाबंदी

विरारमध्ये जुन्या विवा कॉलेजचा परिसर, गोकुळ टाऊनशिप सप्तर्षी, पूर्णिमा, वीर, श्रीपाल नगर, कमला नगर, गोल्डन नेस्ट येथील इमारती अजूनही पाणी साचले आहे. नालासोपारा येथील स्टेशन परिसर, सेन्ट्रल पार्क, गाल नगर, ओसवाल नगरी, टाकी रोड, महेश पार्क, पष्टिद्धr(१५५)मेला स्टेशन परिसर, समेळ पाडा परिसरात गुरूवारी दिवसभर पाण्याखाली होता. वसई पुर्वेचा एव्हरशाईन सिटी, वसंत नगरी गास, चुळणे सनसिटी, दिवाणमान, डिजी नगर परिसर पाण्याखाली आहे. सनसिटी गास रस्ता पाण्यामुळे बंद आहे.