ठाण्याच्या भिवंडी येथील काल्हेरमध्ये एका चप्पलच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. आग विजविण्यासाठी अग्निशमन दलाच्या ६ हून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सकाळी ८ च्या सुमारास ही आग लागली असून अग्निशमन दल आग विझविण्याचे शर्तीचे प्रयत्न करत आहे. अद्याप आग विझविण्यात यश आलेले नाही.

ठाण्याच्या भिवंडीमधील काल्हेर परिसरात अनेक मोठ मोठी गोडाऊने आहेत. त्यातील काल्हेरमधील अरिहंत कंपाउंडमधील एका चप्पलच्या गोडाऊनला गुरुवारी सकाळी ८ च्या सुमारास अचानक आग लागली. बघता बघता आगीने भीषण रूप धारण केल. अग्निशमन दलाला माहिती मिळताच भिवंडी अग्निशमन दलाचे ४ अग्निबंब घटनास्थळी दाखल झाले. परंतु, लागलेली भीषण आग आटोक्यात येत नसल्यामुळे ठाणे, कल्याण, उल्हासनगर येथून अग्निबंबच्या जादा गाड्या मागविण्यात आल्या. अग्निशमन दलाला आग विझविण्यात यश आले नाही. सकाळी गोडाऊन बंद असताना ही आग लागल्यामुळे कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. शोर्टसर्किटमुळे ही आग लागली असावा, अंदाज अग्निशमन दलाने व्यक्त केला आहे. आग आटोक्यात आली नाही तर अधिक गाड्या मागविणार असल्याचे ही अग्निशमन दलाने सांगितले.