News Flash

माजी आमदार गिल्बर्ट मेन्डोसा यांना अटक

कारवाईमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

बनावट कागदपत्रांद्वारे जमीन बळकावल्याचा आरोप

घोडबंदर येथील बोरिवडे गावातील १०८ एकर जमिनीची खोटी कागदपत्रे तयार करून ती बळावल्याप्रकरणी मिरा-भाईंदरमधील राष्ट्रवादीचे माजी आमदार गिल्बर्ट मेन्डोसा यांना कासारवडली पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे. ठाणे सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर अटकेची कारवाई केली. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

ठाणे येथील तलावपाळी परिसरात असलेल्या सहदुय्यम निबंधक कार्यालयात नऊ महिन्यांपूर्वी बोरिवडे गावातील जमिनीची नोंदणी करण्यात आली होती. या नोंदणीसाठी जमिनीची खोटी कागदपत्रे सादर करण्यात आली होती. ही बाब सहदुय्यम निबंधक सुनीलकुमार समदडीया यांच्या निदर्शनास आली होती. तसेच या नोंदणीसाठी कार्यालयातील कर्मचारी अरुण राघो गायकवाड याने त्यांना मदत केल्याची बाबही समोर आली होती. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून ठाणेनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याप्रकरणात राष्ट्रवादीचे माजी आमदार गिल्बर्ट मेन्डोसा हे आरोपी आहेत. बनावट कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तसेच या जमीनीच्या खरेदी व्यवहारामध्ये मूळ मालकाऐवजी दुसऱ्याच व्यक्तीला जमीन मालक दाखविण्यात आले होते. या जमिनीची मूळ मालक एक महिला असून तिने याप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी देताना न्यायालयाने याप्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेश ठाणे पोलिसांना दिले होते. त्यानुसार कासारवडवली पोलिसांनी याप्रकरणी सखोल चौकशी करून गुन्हा दाखल केला होता.

याप्रकरणात तीन जणांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. तर या गुन्ह्य़ात अटक टाळण्यासाठी गिल्बर्ट मेन्डोसा यांनी ठाणे सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. दरम्यान, बुधवारी न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर कासारवडवली पोलिसांनी त्यांच्यावर अटकेची कारवाई केली, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2016 12:40 am

Web Title: former mla gilbert mendonca arrested in land grabbing case
Next Stories
1 बदलापुरात उघडय़ावर खाद्यविक्री
2 बेकायदा इमारतीवरील कारवाईत राज्यमंत्र्याचा अडथळा?
3 मैदानांत स्वस्त भाजीची केंद्रे
Just Now!
X