25 February 2021

News Flash

कोपरी रेल्वे पुलावर सातपैकी चार तुळया बसविण्याचे काम पूर्ण

पूर्व द्रुतगती मार्गावरील कोपरी रेल्वे पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे

ठाणे : पूर्व द्रुतगती मार्गावरील कोपरी रेल्वे पुलावर मध्य रेल्वे प्रशासनाने रविवारी सातपैकी चार तुळया बसविल्या. उर्वरित तीन तुळया सोमवारी पहाटेपर्यंत बसवून पूर्ण होणार आहेत. या कामासाठी १ हजार २०० टन वजन उचलण्याची क्षमता असलेल्या क्रेनचा वापर करण्यात आला. देशात पहिल्यांदाच हा प्रयोग करण्यात आला होता, अशी माहिती अभियंत्यांनी दिली.

पूर्व द्रुतगती मार्गावरील कोपरी रेल्वे पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. त्यामुळे त्याच्या रुंदीकरणाचे आणि दुरुस्तीचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि मध्य रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे. एमएमआरडीएने कोपरी पुलाजवळील भुयारी मार्गावर तुळया बसविल्यानंतर मध्य रेल्वेलाही या ठिकाणी तुळया बसवाव्या लागणार होत्या. त्यामुळे शनिवारी आणि रविवारी रात्री या ठिकाणी मध्य रेल्वे प्रशासनाकडून सात लोखंडी तुळया बसविण्याचे काम हाती घेण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 25, 2021 1:08 am

Web Title: four out of seven beams installed on the kopari railway bridge zws 70
Next Stories
1 ‘आरटीओ’ कार्यालयात विनयभंग
2 पत्रीपूल सोमवारपासून वाहतुकीसाठी खुला
3 जुन्या-नव्या घोषणांची सरमिसळ
Just Now!
X